Chaudhary Charan Singh PV Narasimha Rao Garu MS Swaminathan Honoured With Bharat Ratna Award

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Bharat Ratna Award : भारत सरकारने एकाच वेळी तीन दिग्गजांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले आहे. चौधरी चरण सिंह, नरसिंह राव आणि एमएस स्वामीनाथन (मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार) यांना भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकापाठोपाठ एक तीन ट्वीट करत याबाबतची माहिती दिली. गेल्या आठवड्यात भारत सरकारने माजी उपपंतप्रधान लाल कृष्ण आडवणी यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले होते. एकाच आठवड्यात चार दिग्गजांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेय. 

भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. एखाद्या क्षेत्रात असाधारण आणि सर्वोच्च कामगिरी केल्याबद्दल केंद्र सरकारकडून भारतरत्न पुरस्कार देण्यात येतो. राजकारण, कला, साहित्य, क्रीडा,विज्ञान क्षेत्रातील विचारवंत, शास्त्रज्ञ, उद्योगपती, लेखक आणि समाजसेवक यांना या पुरस्काराने गौरवण्यात येते. कृषी क्षेत्रात भरीव योगदानामुळे एमएस स्वामीनाथन यांना भारतरत्न (मरणोत्तर) पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेय.  

चौधरी चरण सिंह यांच्याबद्दल काय म्हणाले पंतप्रधान ?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, ”देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात येत आहे, हे आपल्या सरकारचे भाग्य आहे. हा सन्मान त्यांनी देशासाठी दिलेल्या अतुलनीय योगदानाला समर्पित आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी समर्पित केले होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असोत वा देशाचे गृहमंत्री आणि आमदार म्हणूनही त्यांनी राष्ट्र उभारणीला नेहमीच गती दिली. आणीबाणीच्या विरोधातही ते ठामपणे उभे राहिले. त्यांचे आमच्या शेतकरी बंधू-भगिनींप्रती असलेले समर्पण आणि आणीबाणीच्या काळात लोकशाहीप्रती असलेली त्यांची बांधिलकी संपूर्ण देशाला प्रेरणादायी आहे.

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts