M S Swaminathan Honoured With Bharat Ratna Award father of green revolution

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Bharat Ratna Award :  हरित क्रांतीचे जनक (father of green revolution) एम.एस स्वामिनाथन यांना मरणोत्तर  (M S Swaminathan ) भारतरत्न  (Bharat Ratna Award) हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर झाला आहे. कृषी क्षेत्रात दिलेल्या त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबतची माहिती दिली आहे. 

 

डॉ. एम एस स्वामीनाथन यांनी आपल्या देशासाठी कृषी आणि शेतकरी कल्याणात अतुलनीय योगदान दिलं आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना भारतरत्न प्रदान करण्यात येत आहे. याचा अत्यंत आनंद असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं. दरम्यान डॉ. एम एस स्वामीनाथन यांच्याबरोबर माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग (Chaudhary Charan Singh), माजी पंतप्रधान नरसिंह राव (Narsimha Rao) यांना देखील भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Bharat Ratna : देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांना भारतरत्न, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली माहिती

अधिक पाहा..



[ad_2]

Related posts