[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Abhishek Ghosalkar Firing Case : महाराष्ट्र हा पुरोगामी राज्य म्हणून ओळखल्या जातो. महाराष्ट्राचा बिहार करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही. जर महाराष्ट्राचा पुरोगामी विचार आणि महाराष्ट्राचे (Maharashtra) चरित्र सांभाळता येत नसेल तर, सत्ताधाऱ्यांनी, मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी तत्काळ आपले राजीनामे दिले पाहिजे. अशी मागणी करत आमदार यशोमती ठाकूर (Yashomati Thakur ) यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र डागले आहे.
सत्ताधाऱ्यांनी, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राजीनामे द्या
आज या गोळीबार प्रकरणांमुळे लोकप्रतिनिधी द्वारे किंवा लोकप्रतिनिधी वर असे गोळीबार होत असतील याचा अर्थ असा आहे की, पोलिसांची भीतीच राहिलेली नाही. आज नागपूर मध्ये क्राइम काय लेव्हलवर वाढत आहे. हेच जर पुण्याकडे बघितले तर कोयता गँगची भीती दिवसेंदिवस वाढत आहे. सदा सरवणकरांचे प्रकरण बघितलं तर तेही एक प्रकरण राज्यात फेमस झालेले आहे. म्हणजे कोणीही, काही करेल, कोणाला कुणाची भीती उरलेले नाही. असे राज्यातले सध्याचे चित्र असल्याच्या आमदार यशोमती ठाकूर म्हणाल्या.
हे सगळे गोळीबार करणारे लोक जाहीरपणे असे म्हणतात, त्यांचे बॉसच आहेत, जे सागर आणि वर्षाबंगल्यावर राहतात. आमचे कोणी काही दुखवू शकत नाही. महाराष्ट्राचा बिहार करणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही. या लोकांना जर महाराष्ट्राचा पुरोगामी विचार आणि महाराष्ट्राचा चरित्र सांभाळता येत नसेल तर नैतिकतेच्या आधारे यांनी खरेच राजीनामे दिले पाहिजे. अशी आमची आग्रही मागणी आहे. प्रकरणाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि सत्ताधाऱ्यांनी, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी बिलकुल राजीनामे द्यायला पाहुजे असे देखील यशोमती ठाकूर म्हणाल्या.
जनता तुम्हाला कधीही माफ करणार नाही
संजय राऊत रोज नवा एक फोटो ट्विट करत आहे. त्यांच्या फोटोत आपण सर्वकाही बघू शकतो, किंबहुना हाचं खरा पुरावा आहे. हीच लोक जेव्हा विरोधी पक्षात असतात, त्यावेळी कशा पद्धतीने आरडाओरड करत असतात. यांना जर महाराष्ट्र सांभाळता येत नसेल तर सोडा ना, तुम्ही अशा प्रकारचे डाग महाराष्ट्राच्या चरित्राला लावत असाल तर महाराष्ट्राची जनता तुम्हाला कधीही माफ करणार नाही, हे याद राखा. असा घनाघात आमदार यशोमती ठाकूर यांनी सत्ताधाऱ्यांवर केला आहे.
गोळीबार प्रकरण नेमकं काय?
मॉरिस दहिसर-बोरिवली परिसरात एनजीओ चालवायचा. परिसरात मॉरिसची स्वयंघोषित नेता म्हणून ओळख होती. वर्षभरापूर्वी दोघांमध्ये वाद झाला होता.अभिषेक घोसाळकरांनी नोरोन्हा विरोधात पोलिसांत तक्रार केली होती. तेव्हा दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं होतं. मात्र काही महिन्यांपूर्वी घट्ट मैत्रीदेखील झाली होती. त्यानंतर दोघं सोबत फेसबुक लाईव्ह करत होते. फेसबुक लाईव्ह संपत आलं असताना मॉरिसनं गोळ्या झाडल्या.
घोसाळकर यांच्या हत्येमागे वैयक्तिक राजकीय वैमनस्य असल्याचे सांगण्यात येत आहे.गेल्या वर्षी एका फौजदारी खटल्यात मॉरिसला तुरुंगात पाठवण्यात घोसाळकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. मॉरिस आणि घोसाळकर यांच्यात तीव्र द्वेष होता. मात्र, त्यांच्यातील वाढत्या भांडणानंतरही मॉरिसने मैत्रीचा हात पुढे करण्याच्या बहाण्याने गुरुवारी अभिषेकला आपल्या कार्यालयात बोलावले होते. त्यानंतर दोघांनी फेसबुक लाईव्ह केले. घोसाळकर जायला निघायले होते, त्यावेळी मॉरिसभाईने गोळ्या झाडल्या.
इतर महत्वाच्या बातम्या
अधिक पाहा..
[ad_2]