Crowd of devotees at Ram temple in Ayodhya more than 18 lakh donations in just two days

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Ram Mandir Donation:

 दररोज लाखो लोक अयोध्येत (Ayodhya) येत आहेत. रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या दोन दिवसांत 18 लाख 50 हजार रुपयांच्या देणग्या आल्या आहेत. अयोध्या राम मंदिरात देणगी देणाऱ्या लोकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. शिवाय देणगीची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. राम मंदिरासाठी भाविक मनापासून दान करत आहेत. गेल्या दोन दिवसांत रामभक्तांनी लाखो रुपयांची देणगी दिल्याची आकडेवारी समोर आली आहे. 

राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या दिवशी 3.17 कोटींचं दान

22 जानेवारी 2024 रोजी राम मदिरा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला. त्यानंतर मोठ्या संख्येने लोक प्रभू रामाच्या दर्शनासाठी अयोध्येला जात आहेत. या ठिकाणी येणारे भाविक मोठ्या श्रद्धेनं दान करत आहेत. रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने जारी केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या दोन दिवसांत 8 लाख 50 हजार रुपयांच्या देणग्या आल्या आहेत. 6 फेब्रुवारीला राम मंदिरासाठी 8.50 लाख रुपयांची देणगी आली, तर 7 फेब्रुवारीला 10 लाख रुपयांची देणगी आली. राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या दिवशी एका दिवसात सर्वाधिक दान करण्यात आले. त्या दिवशी, राम भक्तांनी ऑनलाइन आणि काउंटरवर 3.17 कोटी रुपये दान केले.

11 दिवसांत 11 कोटी रुपयांची देणगी

22 जानेवारीपासून राम मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले असून, त्यानंतर मोठ्या संख्येने लोक दर्शनासाठी अयोध्येत पोहोचत आहेत. 22 जानेवारीनंतर अवघ्या 11 दिवसांत राम मंदिरासाठी 11 कोटींहून अधिक रुपयांची देणगी आली. रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्रानुसार, 11 दिवसांत सुमारे 25 लाख भाविकांनी रामजन्मभूमीला भेट दिली आहे, गेल्या 10 दिवसांत सुमारे 8 कोटी रुपये दानपेटीत जमा करण्यात आले असून सुमारे 3.50 कोटी रुपये ऑनलाइन प्राप्त झाले आहेत.

दररोज 2 लाखांहून अधिक भाविक राम मंदिराच्या दर्शनासाठी

राम मंदिर ट्रस्टचे कार्यालय प्रभारी प्रकाश गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, दररोज 2 लाखांहून अधिक भाविक राम मंदिराच्या दर्शनासाठी येत आहेत. मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शन पथाजवळ चार मोठ्या आकाराच्या दानपेट्या ठेवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये भाविक पैसे देतात. उल्लेखनीय बाब म्हणजे या ठिकाणी 14 लोकांची टीम आहे, ज्यामध्ये 11 बँक कर्मचारी आणि मंदिर ट्रस्टचे तीन लोक आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या देखरेखीखाली देणग्या मोजल्या जातात, असे त्यांनी सांगितले.

22 जानेवारीला अगदी थाटामाटात अयोध्येतील राम मंदिराचा (Ram Mandir) उद्घाटन सोहळा संपन्न झाला. देशभरात या सोहळ्याची सर्वत्र जोरदार चर्चा झाली. या राम मंदिराच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात अयोध्येत धार्मिक पर्यटन वाढलं आहे. दरवर्षी अयोध्येत 5 कोटी पर्यटक येतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळं 2 लाख लोकांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Ayodhya Flights : अयोध्येला थेट विमानसेवा! मुंबई, पाटणासह 8 शहरांमधून सेवा सुरू होणार

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts