Ravindra Dhangekar on Nikhil Wagle Attack by BJP in Pune

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : पत्रकार निखिल वागळेंच्या ((Nikhil wagle Car Attack) गाडीवर हल्ला करण्यात आला. राष्ट्र सेवा दलमध्ये निर्भय बनो (Nirbhay Bano) या कार्यक्रमाला निखिल वागळे वक्ते होते. या कार्यक्रमासाठी येत असताना डेक्कन भागातील खंडोजी बाबा चौकात हल्ला करण्यात आला. निखिल वागळेंनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी  ( PM Naremdra Modi) यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यावर भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि हल्ला केला.  या प्रकरणावर आता कसब्याचे आमदार रविंद्र धंगेकर  (Ravindra Dhangekar)यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निखिल वागळेंच्या गाडीवर हल्ला, शाईफेक करण्याची घटना लोकशाहीची हत्या असल्याचं ते म्हणाले. भाजपने आपली भूमिका मांडावी, निषेध करावा पण गुंडगिरी करुन आणि महिलांवर हल्ला करुन त्यांनी आपली भूमिका मांडू नये ही साफ दडपशाही आहे. मुद्यांची लढाई गुद्यांवर आणू नये, हा हल्ला पोलिसांच्या संगनमताने केला, अशा शब्दांत त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. 

[ad_2]

Related posts