[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
UPI Service to Sri Lanka and Mauritius : श्रीलंका आणि मॉरिशसला फिरायला जाणाऱ्या आणि व्यवसायासाठी जाणाऱ्या लोकांसाठी एक मोठी बातमी आहे. सोमवार, 12 फेब्रुवारीपासून भारत सरकारकडून श्रीलंका आणि मॉरिशससाठी UPI सेवा सुरू करणार आहेत. यासोबतच या दोन देशांमध्ये UPI आणि RuPay कनेक्टिव्हिटी देखील उपलब्ध असेल. UPI ग्लोबल बनवण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल मानले जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी या सेवेचे उद्घाटन करणार आहे. त्यामुळे या दोन देशांतील भारतीय पर्यटकांची मोठी सोय होणार आहे. अलीकडेच, फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये असलेल्या आयफेल टॉवरवर देखील UPI सेवा सुरू करण्यात आली. फ्रान्स हळूहळू ही सेवा संपूर्ण देशात लागू करणार आहे.
PM of India @narendramodi, PM of Mauritius @MauritiusPM, and President of Sri Lanka to witness historic launch of UPI and RuPay connectivity with Mauritius and Sri Lanka #UPI – #RuPay on February 12, 2024 at 1:00 PM.
Live at: https://t.co/8uDyl9x0A9@DasShaktikanta, @RBI,… pic.twitter.com/KwZL14xY2o
— ReserveBankOfIndia (@RBI) February 11, 2024
पर्यटकांना सुलभ सेवा मिळणार
परराष्ट्र मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, श्रीलंका आणि मॉरिशसमध्ये UPI सेवा (Unified Payment Interface) सुरू होणार आहे. या सेवेच्या माध्यमातून या दोन्ही देशांना भेट देणारे भारतीय पर्यटक आणि भारतात येणाऱ्या मॉरिशसच्या नागरिकांनाही याचा फायदा होणार आहे. मॉरिशससाठी RuPay कनेक्टिव्हिटी देखील सुरू केली जाणार आहे.
मॉरिशसमध्ये रुपे कार्ड सुरू होणार
भारतातील रुप कार्डची सेवा आता मॉरिशसमध्येही सुरू होणार आहे. भारत फिनटेक क्रांतीचा लिडर म्हणून उदयास येत असून देशातील डिजिटल पायाभूत सुविधा मजबूत झाल्या आहेत. ही UPI सेवा सहयोगी देशांमध्ये नेण्यासाठी पंतप्रधान मोदी प्रयत्नशील आहेत.
श्रीलंका आणि मॉरिशसशी भारताचे सांस्कृतिक आणि सामाजिक संबंध आहेत. यूपीआय सेवेमुळे दोन्ही बाजूंच्या लोकांना सीमेपलीकडे डिजिटल व्यवहारांची सुविधा मिळू शकणार आहे. याशिवाय या देशांशी भारताची डिजिटल कनेक्टिव्हिटीही वाढेल.
अलीकडेच 7 फेब्रुवारी रोजी, बहरीनमधील भारतीय दूतावासाने डिजिटल फी कलेक्शन किओस्क सुरू केले. यासाठी ICICI बँक आणि सदद इलेक्ट्रॉनिक पेमेंट सिस्टम BSC यांनी भारतीय दूतावासाशी हातमिळवणी केली आहे. हे सेल्फ सर्व्हिस टच स्क्रीन किओस्क आहे. बहरीनमध्ये राहणारे सुमारे 3.40 लाख भारतीय याचा लाभ घेत आहेत. आता ते त्याच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे पासपोर्ट नूतनीकरण, प्रमाणीकरण, विवाह नोंदणी आणि जन्म नोंदणीसाठी शुल्क भरू शकतात.
ही बातमी वाचा:
अधिक पाहा..
[ad_2]