budget Airline Spicejet to Layoff 1400 employees amid financial crisis Global Layoffs Know More Details Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Airline Spicejet Layoff: नवी दिल्ली : सध्या जगभरात पुन्हा एकदा मंदीची लाट आली आहे. जगभरातील टाळेबंदीच्या (Layoffs) लाटेमध्ये भारतही होरपळून निघत आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. जगभरातील टाळेबंदीचा परिणाम भारतीयांच्या नोकऱ्यांवरही होऊ लागला आहे. आधीपासूनच आर्थिक संकटाचा सामना करत असलेली बजेट एअरलाईन्स स्पाईसजेट (SpiceJet Airlines) आपल्या हजारो कर्मचाऱ्यांना नारळ देण्याची तयारी करत असल्याची माहिती मिळत आहे. आर्थिक चणचणीमुळे त्रस्त असलेली कंपनी स्वतःवरील बोजा कमी करण्यासाठी कंपनी हे पाऊल उचलत असल्याची माहिती मिळत आहे. 

15 टक्के कर्मचाऱ्यांना मिळणार नारळ 

ET च्या अहवालानुसार, SpiceJet 1,400 कर्मचाऱ्यांना कंपनीकडून नारळ मिळणार आहे. जे कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांच्या सुमारे 15 टक्के इतकं आहे. सध्या कंपनीचे एकूण कर्मचारी नऊ हजारांच्या आसपास आहेत. कंपनी सध्या सुमारे 30 विमानं चालवतात, त्यापैकी 8 भाडेतत्त्वावर घेतलेली आहेत. अहवालानुसार, एअरलाइन्सकडून देखील टाळेबंदीची पुष्टी करण्यात आली आहे.

सॅलरी बिल तब्बल 60 कोटींचं 

गुंतवणूकदारांचा विश्वास जपण्यासाठी कंपनीवर खर्च कमी करण्याचा दबाव आहे. कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांचं सॅलरी बिल तब्बल 60 कोटींचं असल्याची माहिती मिळत आहे. अशा परिस्थितीत कंपनी खर्च कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. 1,400 कर्मचाऱ्यांना काढून टाकणं हा देखील खर्च कमी करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग आहे, असल्याची माहिती समोर आली आहे. 

गेल्या अनेक महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचे पगार रखडले       

ईडीनं दिलेल्या माहितीनुसार, स्पाईसजेटच्या अनेक कर्मचाऱ्यांची नोकरी जाणार असून त्यांना त्यासंदर्भात कंपनीकडून माहितीही देण्यात आली आहे. यापूर्वी स्पाईसजेटचे सर्वच कर्मचारी वेतन कपातीचा सामना करत होतेच, पण त्यासोबतच गेल्या अनेक दिवसांपासून कंपनीतील कर्मचाऱ्यांचे पगारही रखडले आहेत. कंपनीतील कर्मचाऱ्यांना अजुनही जानेवारी महिन्याचा पगार देण्यात आलेला नाही. कंपनी काही गुंतवणूकदारांकडून 2 हजार 200 कोटी रुपयांचं कॅपिटल इंफ्यूजनच्या प्रक्रियेत आहे.

टेक कंपन्यांकडूनही टाळेबंदी   

सध्या जागभरात टाळेबंदी सुरू आहे. अशाकच स्पाईसजेटमधील टाळेबंदीच्या बातमीनं पुन्हा एकदा सर्वांच्या हृदयाचा ठोका चुकवला आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासून टाळेबंदीचा वेग वाढला आहे. ॲमेझॉन, गुगल, मायक्रोसॉफ्ट, सिस्को यांसारख्या अनेक मोठ्या कंपन्यांनी यावर्षी आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं आहे. दरम्यान, जगभरात सुरू असलेल्या छाटणीचा सर्वात जास्त परिणाम टेक कंपन्यांवर होत आहे. एका अहवालानुसार, एकट्या जानेवारीमध्ये टेक कंपन्यांनी 32 हजारांहून अधिक लोकांना कामावरून काढून टाकलं आहे.

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts