morning headlines breaking national state news live headlines bulletin morning 12th February 2024 india maharashtra latest update marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील…

Indian Ex Navy Officers Released: भारतीय मुत्सुद्देगिरीला मोठं यश! कतारमध्ये मृत्युदंडाची शिक्षा सुनावलेल्या आठ माजी नौदल अधिकाऱ्यांची सुटका

Indian Ex Navy Officers Released From Qatar Jail: नवी दिल्ली : भारताला मोठा राजनैतिक विजय मिळाला आहे. कतारमध्ये (Qatar) हेरगिरीच्या आरोपात मृत्युदंडाची शिक्षा (Death Penalty) सुनावलेल्या सर्व आठ माजी नौदल अधिकाऱ्यांची (Naval Officers) सुटका झाली आहे. आठपैकी सात अधिकारी मायदेशी परतले आहेत. कतार कोर्टानं मागील वर्षी डिसेंबर महिन्यात अल दाहरा ग्लोबल प्रकरणात आठ माजी नौदल अधिकाऱ्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली होती… वाचा सविस्तर 

Spicejet Layoff: जागतिक आर्थिक मंदीचं सावट; स्पाईसजेटमधील हजारो कर्मचाऱ्यांना नारळ

Airline Spicejet Layoff: नवी दिल्ली : सध्या जगभरात पुन्हा एकदा मंदीची लाट आली आहे. जगभरातील टाळेबंदीच्या (Layoffs) लाटेमध्ये भारतही होरपळून निघत आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. जगभरातील टाळेबंदीचा परिणाम भारतीयांच्या नोकऱ्यांवरही होऊ लागला आहे. आधीपासूनच आर्थिक संकटाचा सामना करत असलेली बजेट एअरलाईन्स स्पाईसजेट (SpiceJet Airlines) आपल्या हजारो कर्मचाऱ्यांना नारळ देण्याची तयारी करत असल्याची माहिती मिळत आहे. आर्थिक चणचणीमुळे त्रस्त असलेली कंपनी स्वतःवरील बोजा कमी करण्यासाठी कंपनी हे पाऊल उचलत असल्याची माहिती मिळत आहे… वाचा सविस्तर 

Politics : बिहारमध्ये राजकीय हालचाली वाढल्या, तेजस्वी यादवांच्या निवासस्थानी मोठा पोलिस बंदोबस्त, तर जेडीयूच्या आमदारांना हॉटेलमध्ये हलवले 

Bihar Politics : बिहारमध्ये राजकीय हालचाली वाढल्याचं चित्र दिसत आहे. बिहारमध्ये सरकार बदलल्यानंतर आज होणाऱ्या विश्वासदर्शक ठरावापूर्वी (Floor Test) नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्या जेडीयू (JDU) पक्षातील आमदारांना हॉटेलमध्ये हलवण्यात आले आहे. भाजपच्या (BJP) एनडीएमध्ये परतल्याने जेडीयूसाठी ही मोठी परीक्षा मानली जात आहे. तर तेजस्वी यादवांच्या घराला पोलिसांनी चारही बाजूंनी वेढा दिल्याचं समजत आहे. दरम्यान, तेजस्वी यादव यांच्या घराला वेढा दिलेल्या पोलिस दलामागे नितीश कुमार यांच्या हातातून सरकार जाण्याच्या भीतीचा ठपका राष्ट्रीय जनता दलाने लावला आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, आरजेडीचे सर्व आमदार तेजस्वी यांच्या निवासस्थानी उपस्थित आहेत. काहींना त्यांच्या संमतीशिवाय नजरकैदेत ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन निवासस्थानी हजर आहे… वाचा सविस्तर 

Mithun Chakraborty Health Updates : मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती स्थिर, रुग्णालयातून व्हिडीओ आला समोर

Mithun Chakraborty Health Updates :  बॉलिवूड अभिनेते आणि भाजप नेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांची प्रकृती स्थिर आहे. शनिवारी, मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांना ब्रेनस्ट्रोकमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मिथुन यांनी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्यांचे चाहते चिंतेत होते. आता रुग्णालयातून त्यांचा व्हिडीओ समोर आला आहे… वाचा सविस्तर 

Under 19 World Cup 2024: नेमकं चुकलं कुठे? टीम इंडियाच्या कर्णधारानं सांगितलं कांगारुंविरुद्धच्या पराभवाचं कारण

U19 Team India vs Australia U19 Final: कांगारूंनी पुन्हा एकदा टीम इंडियाला (Team India) रडवलं. ऑसी संघानं मोठ्या शिताफिनं टीम इंडियाच्या धुरंधरांना थोपवत तब्बल चौथ्यांदा वर्ल्डकपवर (U19 World Cup 2024) आपलं नाव कोरलं. अंडर-19 वर्ल्डकप 2024 स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात खेळवण्यात आला. विजेतेपदाच्या लढतीत कांगारूंनी टीम इंडियाचा तब्बल 79 धावांनी पराभव केला. अंतिम फेरीतील पराभवानंतर भारतीय कर्णधार उदय सहारननं (Uday Saharan) आपली चूक उघडपणे मान्य केली आणि पराभवाचं कारणही सांगितलं… वाचा सविस्तर 

India vs England 3rd Test : पाच वर्षांनंतर होतोय सामना, राजकोटमध्ये टीम इंडियाचा कसाय रेकॉर्ड?

India vs England 3rd Test : भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील तिसरा कसोटी सामना राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (Saurashtra Cricket Association Stadium Rajkot) होणार आहे. पाच सामन्याची कसोटी मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. त्यामुळे दोन्ही संघासाठी राजकोट (IND vs ENG)  कसोटी सामना महत्वाचा ठरणार आहे. राजकोटच्या मैदानावर पाच वर्षानंतर कसोटी सामना होत आहे. वाचा सविस्तर 

Horoscope Today 12 February 2024 : आजचा सोमवार खास! 12 राशींसाठी दिवस कसा असेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या

Horoscope Today 12 February 2024 : राशीभविष्यानुसार, आज म्हणजेच, 12 फेब्रुवारी 2024, सोमवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार, सिंह राशीच्या लोकांना आज आर्थिक नुकसानीबाबत थोडं सावध राहावं लागेल, धनु राशीच्या लोकांना आज आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. सर्व राशीच्या लोकांसाठी सोमवार कसा राहील? सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या… वाचा सविस्तर 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts