technology news excitel valentines day offer now excitel 200mbps plans starts from rs424 per month with ott subscription marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Excitel Plans : सध्या सगळीकडे प्रेमाचे वारे वाहू लागले आहेत. अर्थात, प्रेमाचा आठवडा म्हणजेच व्हॅलेंटाईन वीक (Valentine Week) सुरु आहे. त्यातच आजचा दिवस हा प्रेमी युगुलांसाठी खास आहे. याच निमित्ताने एक्साइट ब्रॉडबँडने तुमच्यासाठी खास ऑफर आणली आहे. ही खास व्हॅलेंटाईन डे ऑफर आहे. या ऑफरच्या माध्यमातून, Excitel 200Mbps आणि Excitel 300Mpbps इंटरनेट प्लॅनची ​​किंमत 424 रुपये प्रति महिना पासून सुरू होईल. इतकेच नाही तर या प्लॅन्ससह यूजर्सना 20 OTT ॲप्सचा लाभ मोफत दिला जाईल.

कंपनीचे म्हणणे आहे की, यूजर्स या ऑफरचा लाभ केवळ एक्सिटेल किकस्टार्टर प्लॅन्समध्ये 200Mbps आणि 300Mbps पर्यंतचा स्पीड देऊ शकतील. ही ऑफर किती काळापर्यंत असेल आणि या सेवेच्या कोणत्या प्लॅन्ससाठी तुम्हाला किती पैसे मोजावे लागतील? या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 

Excitel 200 Mbps योजनेची किंमत

तुम्हाला हा प्लॅन 424 रुपये प्रति महिना दराने मिळेल, पण यासाठी तुम्हाला कंपनीकडून एकाच वेळी 12 महिन्यांचा सबस्क्रिप्शन प्लान घ्यावा लागेल. आता आम्ही तुम्हाला 300Mbps पर्यंत स्पीड ऑफर करण्याच्या प्लॅनच्या किंमतीबद्दल माहिती देऊ.

Excitel 300 Mbps योजनेची किंमत किती? 

जर तुम्हाला थोडा वेगवान इंटरनेट स्पीड हवा असेल तर तुम्हाला दरमहा 474 रुपये खर्च करावे लागतील. लक्षात घ्या की तुम्ही एकाच वेळी 12 महिन्यांची सदस्यता घेतली तरच तुम्हाला ही योजना या किमतीत मिळू शकेल. दोन्ही ब्रॉडबँड प्लॅन 6 महिने आणि 3 महिन्यांचे भाडे पर्याय देखील देतात.

या OTT ॲप्सचे फायदे

दोन्ही योजनांसह, कंपनी तुम्हाला 30 दिवसांसाठी एकूण 20 OTT ॲप्सची सदस्यता देईल. हे प्लॅन SonyLIV, SunNXT, ZEE5, Aha Telugu, Alt Balaji, RunnTV, Nammaflix, Play Flix, OmTV, Shorts TV आणि इतरांसह ॲप्समध्ये प्रवेश देतात.

याकडेही लक्ष द्या 

या ठिकाणी एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे तुम्ही Excitel प्लॅन किंवा Jio ब्रॉडबँड प्लॅन खरेदी कराल तेव्हा तुम्हाला प्लानच्या किंमती व्यतिरिक्त 18 टक्के GST स्वतंत्रपणे भरावा लागेल. जसे की, समजा प्लॅनची ​​किंमत 424 रुपये आहे, तर GST नंतर या प्लॅनची ​​किंमत 500.32 रुपये असेल. अशा प्रकारे तुम्ही या अॅपचा लाभ घेऊ शकता. 

महत्त्वाच्या बातम्या : 

Google Doodle Today : तुमच्या नात्यातील Bond कसा आहे? हे आता गुगल सांगणार; गुगलकडून ‘व्हॅलेंटाईन डे’चं खास डूडल

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts