मावळ लोकसभा खासदार श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील आदर्श व्यक्ती, संस्थांचा गौरव

पिंपरी (pragatbharat.com):-  मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे संसदरत्न खासदार श्रीरंग  बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त लोकाभिमुख कर्तव्य संपन्न, आदर्श व्यक्ती आणि संस्थांचा शुक्रवारी (दि.16) सन्मान होणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे, सिने अभिनेते अशोक समर्थ यांच्या हस्ते हा सन्मान सोहळा होणार आहे.खासदार श्रीरंग आप्पा बारणे सोशल फाऊंडेशनच्या वतीने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे.  याबाबतची माहिती फाऊंडेशनचे अध्यक्ष धनाजी बारणे, उपाध्यक्ष रवी नामदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. खासदार श्रीरंग बारणे यांचा गुरुवारी वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मागील चार दिवसांपासून विविध कार्यक्रम होत आहेत.‘या’ आदर्श व्यक्ती, संस्थांचा होणार सन्मानशहरातील लोकाभिमुख कर्तव्य संपन्न, आदर्श व्यक्ती आणि संस्थांचा गौरव केला जाणार आहे. वारकरी भूषण पुरस्काराने ह.भ.प डॉ. पंकज महाराज गावडे, ह.भ.प जालंधर महाराज काळोखे, समाज भूषण पुरस्काराने भाऊसाहेब भोईर, आरोग्य भूषण पुरस्काराने डॉ. अविनाश वाचासुंदर, उद्योगरत्न पुरस्काराने राकेश सोनिगरा, योग भूषण पुरस्काराने वैशाली देशमाने, पर्यावरण भूषण पुरस्काराने अजित जगताप, शिक्षणरत्न पुरस्काराने धनंजय वर्णेकर, शिक्षण भूषण पुरस्काराने आरती भेगडे, शिक्षणरत्न पुरस्काराने नीता मोहिते, दुर्गरत्न पुरस्काराने शिवदुर्ग मित्र लोणावळा ट्रेकिंग अॅण्ड अॅडव्हेचर क्लब, कृषीरत्न पुरस्काराने खंडू भोंडवे, क्रीडारत्न पुरस्काराने खुशी मुल्ला, समाज भूषण पुरस्काराने सुर्यकांत ताम्हाणे, रामदास माळी, बसवराज कनजे, आदर्श कामगार युनियन एस.के.एफ.कामगार युनियन, समाजसेवा भूषण पुरस्काराने सातारा मित्र मंडळ, आदर्श सोसायटी पुरस्काराने गणेशम 2 सोसायटी, रामतीर्थ हौसिंग सोसायटी, रिचमंड सोसायटीचा सन्मान करण्यात येणार आहे.

Related posts