Pune Maharashtra Navnirman Sena Maharashtra Politics JSPM School Pune Raj Thackeray Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pune : पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून वाघोली येथील जे एस पी एम शाळेत तोडफोड करण्यात आली आहे. जे एस पी एम “प्रोडिजि” शाळेतील विद्यार्थ्यांना आणि पालकांना ऐन परीक्षेच्या वेळेस मनस्ताप सहन करावा लागत असल्याचा आरोप करत मनसेकडून तोडफोड करण्यात आली. कोरोना काळातील जुन्या फी वसुलीसाठी 10 वी च्या परीक्षेचे हॉल तिकीट नाकारल्याने मनसेने आंदोलन करत तोडफोड केली. 

23 फेब्रुवारीला अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात धडकणार मोर्चा

विद्यार्थ्यांच्या समस्या सोडण्यासाठी आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे सुपूत्र अमित्र ठाकरे (Amit Thackeray) मैदानात उतरणार आहेत. पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन करण्यात आलय. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत पुण्यात धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या प्रलंबित असलेल्या अनेक प्रश्नांचा जाब विचारण्यासाठी मनसे आक्रमक झाली आहे. 23 फेब्रुवारी रोजी अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते मोर्चेत सहभागी होणार आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts