Ashadhi Wari 2023 Tukaram Maharaj’s Palanquin Stay At Vitthal Temple In Akurdi

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Ashadhi wari 2023 : श्री क्षेत्र देहू येथून प्रस्थान ठेवत श्री संत तुकाराम महाराज (sant tukaram maharaj temple) यांची पालखी हजारो वारकर्‍यांसह पिंपरी चिंचवड शहरात दाखल  झाली. आज पालखीचा मुक्काम आकुर्डीत असणार आहे. आकुर्डीतील विठ्ठल रुक्मिणी मंदीरात तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम आहे. वर्षानुवर्षे परंपरागत हा पालखी सोहळा होत असताना पिंपरी चिंचवड शहराला वारक-यांची सेवा करण्याचा योग येतो. आज पिंपरी-चिंचवडकर तुकाराम महाराजांच्या पालखीची आणि वारकऱ्यांची सेवा करताना दिसत आहे. 

दरवर्षी तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम पाषाणात असलेले हे मंदिर आणि त्यातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात असतो. वर्षानुवर्षाच्या परंपरेनुसार आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात विसावा घेतो.  आकुर्डीतील विठ्ठल मंदिर हे परंपरेने कुटे कुटुंबीयांकडे आले आहे. हे मंदिर 400 वर्षांपूर्वीचं आहे. पायी वारी करत असताना तुकाराम महाराजदेखील याच मंदिरात विसावा घेत होते. वारकर्‍यांच्या सेवेसाठी कुटे कुटुंबीयच नाही तर शहर पसिरातील सर्व नागरिकांचा सहभाग असतो

 
अशी आहे मंदिराची आख्यायिका…

श्री संत तुकाराम महाराज पंढरीच्या वारीसाठी देहूगावातून निघाले. त्यावेळी आकुर्डी गावाजवळ येताच त्यांच्या पोटात दुखायला लागले. असह्य वेदनांनी ते हतबल झाले होते. घरगुती उपचारांनंतरही त्यांच्या वेदना थांबल्या नाही. यामुळे यंदा वारी चुकते की काय अशा विचाराने वारकऱ्यांना वाटले. तेवढ्यात याठिकाणी साक्षात विठ्ठल रुक्मिणी अवतरले. त्यानंतर तुकाराम महाराजांची पोटदुखी कमी झाली. त्याच ठिकाणी हे विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर बांधण्यात आले अशी मंदिराची आख्यायिका आहे. त्यामुळे पालखीच्या पहिल्या मुक्कामाचा मान आकुर्डीला मिळतो.  
 
 
वारकऱ्यांची शहरात ठिकठिकाणी सोय –

पालखी सोहळ्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेकडून मंदिर व परिसराची स्वच्छता, पाण्याची व्यवस्था केली जाणार आहे. मंदिराच्या शेजारी मोठे शेड बांधले आहे. त्यामध्ये दर्शनरांग तयार केली आहे. तसेच स्वतंत्र खोल्यांची देखील व्यवस्था आहे.  वारकरी दरवर्षी ठरल्याप्रमाणे शहरवासीयांच्या घरी विसावा घेतात. शहरवासीय देखील वारकर्‍यांना घरी आलेल्या पाहुण्यांना घेतल्याप्रमाणे त्यांना सामावून घेतात. तसेच नेहमीप्रमाणे मनपा शाळांमध्ये देखील काही वारकर्‍यांची राहण्याची व्यवस्था केली जाते.
 

आमच्या पूर्वजांनी मंदिर बांधले आहे.  ही  परंपरा आमचे कुटुंबीय मोठ्या भक्तीने आणि उत्साहाने चालवतात. विसाव्याच्या दिवशी पालखी सोहळ्याचे मानकरी आणि सेवेकरी मंदिरात विसाव्याला असतात. तसेच  दररोज सकाळी अभिषेक, काकडा तसेच संध्याकाळी नित्यनेमाने हरिपाठ, कीर्तन होते, असं मंदिराचे विश्वस्त गोपाळ कुटे यांनी सांगितलं आहे. 
 

[ad_2]

Related posts