Ind Vs Eng Kl Rahul Is Likely To Replace Rajat Patidar In Ranchi Test Against England

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Rajat Patidar or KL Rahul : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यातील तीन सामने झाले आहेत. इंग्लंडनं (IND vs ENG) पहिल्याच कसोटी मालिकेत विजय मिळवत शानदार सुरुवात केली. पण त्यानंतर रोहितच्या नेतृत्वातील भारतीय संघाने जोरदार पलटवार दिला. विशाखापट्टणम आणि राजकोट कसोटी (Rajkot Test) जिंकत भारताने मालिकेत आघाडी घेतली. पाच कसोटी सामन्याच्या मालिकेत भारताने 2-1 ने आघाडी घेतली. राजकोट कसोटी सामन्यात भारताने 434 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. आता 23 फेब्रुवारी रोजी रांची येथे चौथी कसोटी सामना होणार आहे. या कसोटी सामन्यात भारताच्या प्लेईंग 11 मध्ये बदल निश्चित होण्याची शक्यता आहे. जसप्रीत बुमराह याला आराम देण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. त्याशिवाय, रजत पाटीदार याला बेंचवरच बसावं लागू शकतं. भारताचा स्टार फलंदाज केएल राहुल याचं कमबॅक निश्चित आहे. दुखापतीमुळे राहुल राजकोट कसोटीला मुकला होता.

रजत पाटीदार बेंचवर बसणार – 

युवा रजत पाटीदार यानं विशाखापट्टणम येथील दुसऱ्या कसोटी सामन्यात पदार्पण केले. पण दोन कसोटीच्या चार डावात त्याला प्रभावी कामगिरी करता आली नाही.  पदार्पणाच्या कसोटी सामन्यात रजत पाटीदार यानं पहिल्या डावात 32 आणि दुसऱ्य डावात 9 धावा केल्या. पण राजकोट कसोटी सामन्यात त्याच्याकडून मोठी अपेक्षा होती. पण त्याला अपयश आले. तिसऱ्या कसोटी सामन्यात रजत पाटीदार याला दोन्ही डावात फक्त पाच धावा करता आल्या. पहिल्या डावात पाच आणि दुसऱ्या डावात खातेही उघडता आले नाही. खराब फॉर्ममुळे रजत पाटीदार याला रांची कसोटी सामन्यातून डच्चू मिळण्याची शक्यता आहे. 

केएल राहुलचं कमबॅक – 

रांची कसोटी सामन्यात भारताच्या प्लेईंग 11 मध्ये बदल निश्चित मानले जात आहे. केएल राहुल यानं दुखापतीपासून सावरला आहे. त्यामुळे रांची कसोटी सामन्यात केएल राहुल प्लेईंग 11 मध्ये  खेळणार हे जवळपास निश्चित आहे. रजत पाटीदार वगळता भारताचे इतर सर्व फलंदाज भन्नाट फॉर्मात आहेत. त्यामुळे रांची कसोटीत पाटीदारचा पत्ता कट होऊ शकतो. अनुभवी केएल राहुल चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरु शकतो.  

आणखी वाचा :

India vs England, Ben Stokes : भारताकडून धुळदाण होताच बेन स्टोक्सने अंपायरिंगवर उपस्थित केले सवाल, आयसीसीकडे मोठी मागणी



[ad_2]

Related posts