महिला कुस्तीपटूवर 6 ठिकाणी लैंगिक अत्याचार, बृजभूषण सिंह यांच्याविरोधा 17 लोकांची साक्ष; चार्जशीटमधून मोठा खुलासा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Brijbhushan Singh Sexual Assault: भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिह (Brijbhushan Singh) यांच्याविरोधात कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे (Sexual Assault) आरोप केले असून आता या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. ‘आज तक’ने दिलेल्या वृत्तानुसार, बृजभूषण सिह प्रकरणी पोलिसांनी दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये पीडित महिला कुस्तीपटूने पोलीस आणि दंडाधिकाऱ्यांसमोर दिलेल्या जबाबाच्या समर्थनार्थ 16 ते 17 लोकांनी साक्ष दिली आहे. तसंच हे आरोप योग्य असल्याचं सांगितलं आहे. चार्जशीटमध्ये 6 पीडित कुस्तीपटूंच्या कुटुंबीयांना साक्षीदार बनवण्यात आलं आहे. यामध्ये त्यांचे पतीही सहभागी आहेत. एकूण 5 साक्षीदार असे आहेत, जे कुटुंबातील आहेत. …

Read More