( प्रगत भारत । pragatbharat.com) Chandrayan 3 Viral Video: शुक्रवारी चांद्रयान-3 (Chandrayan 3) अवकाशात झेपावलं आणि अनेक भारतीयांची मान अभिमानाने उंचावली. भारतीय अंतराळ संशोधन संस्था ‘इस्रो’च्या (ISRO) महत्त्वाकांक्षी मोहिमेकडे संपूर्ण देशवासियांच्या नजरा होत्या. दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी ‘एलव्हीएम३-एम४’ प्रक्षेपणयान चंद्राच्या दिशेने झेपावलं आणि भारतीयांनी एकच जल्लोष सुरु केला. श्रीहरीकोटा येथे हे प्रक्षेपण पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी अनेक वैज्ञानिक संस्था तसंच शाळांनीही प्रक्षेपणाची व्यवस्था केली होती. चांद्रयान-3 चं लाईव्ह प्रक्षपेण पाहण्यासाठी अनेक कार्यालयांनीही काही काळ काम थांबवत टीव्हीकडे नजरा वळवल्या होत्या. चांद्रयान-3…
Read More