भाजीवाल्याकडे UPI पेमेंट सुविधा पाहून जर्मनीचा मंत्री भारावला, भारताचं तोंडभरुन केलं कौतुक

( प्रगत भारत । pragatbharat.com) करोनानंतर भारतामध्ये ऑनलाइन व्यवहारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सुपरमार्केटपासून ते रस्त्यावरच्या भाजीवाल्यापर्यंत सर्वांकडे आता युपीआय पेमेंटची सुविधा आहे. दरम्यान, भारताच्या या प्रगतीने जर्मनीचे मंत्री भारावले आहेत. जर्मनीचे डिजिटल आणि वाहतूक मंत्री वोल्कर विसिंग (Volker Wissing) यांनी भारतातील या सुविधेचा लाभ घेतला असून सोपी पद्धत पाहून आश्चर्यचकित झाले आहेत.  भारतातील जर्मन दूतावासाने रविवारी भारताच्या डिजिटल पायाभूत सुविधांचे कौतुक केलं असून ट्विटरला पोस्ट शेअर केली आहे. हा भारताच्या यशोगाथेचा एक भाग असल्याचं ते म्हणाले आहेत.  जर्मन दूतावासाने (German Embassy) वोल्कर विसिंग (Volker Wissing) यांचे रस्त्यावर भाजी…

Read More