( प्रगत भारत । pragatbharat.com) Afghanistan Earthquake: अफगाणिस्तान पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्याने हादरले आहे. तालिबानी प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानच्या पश्चिमी भागात शक्तीशाली भूकंप झाला आहे. या भूकंपात जवळपास दोन हजार नागरिकांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येतेय. पश्चिम अफगाणिस्तानात ईराणच्या सीमेजवळ देखील भूकंपाचे हादरे जाणवले. या भूकंपानंतर मोठ्या प्रमाणात लोक जखमी झाले आहेत. तर, भूकंपाची तीव्रता 6.3 इतकी मोजण्यात आली आहे. भूकंपामुळं हेरात शहरापासून जवळपास 40 किमी (25 मील) दूर असलेल्या अनेक गावं उद्ध्वस्त झाली आहेत. अनेक इमारती कोलमडून पडल्या आहेत. तर, यामुळं शेकडो नागरिक मलब्याखाली सापडले आहेत. नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार,…
Read More