तुर्कीत संसदेबाहेर दहशतवाद्याने स्वत:ला बॉम्बने कसं उडवलं? पाहा LIVE VIDEO

( प्रगत भारत । pragatbharat.com) तुर्कीची राजधानी अंकारामध्ये रविवारी संसदेजवळ जोरदार स्फोट झाला. या स्फोटात सहभागी दहशतवाद्याने स्वत:ला बॉम्बने उडवलं. तसंच दुसरा दहशतवादी कारवाईत ठार झाला. या हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. स्फोटानंतर तिथे आगीचे लोळ उठले होते. स्फोट इतका जबरदस्त होता की, कित्येक किमीपर्यंत त्याचा आवाज ऐकू गेला. यादरम्यान संसदेजवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा दहशतवादी हल्ला कैद झाला आहे. यामध्ये दहशतवाद्यांनी नेमका कशाप्रकारे स्फोट घडवला हे स्पष्ट दिसत आहे.  व्हिडीओत दिसत आहे त्यानुसार, दोन हल्लेखोर सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास एका कारमधून येतात. यानंतर ते गृह मंत्रालयाच्या जनरल डायरेक्टोरेट…

Read More