युक्रेनमधलं धरण फुटलं की फोडलं? 42000 लोकांचा जीव धोक्यात; प्राणीसंग्रहालयातील 300 प्राण्यांना जलसमाधी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ukraine Dam Collapse: दीड वर्षांपासून सुरु असलेल्या युक्रेनविरुद्ध रशिया युद्धादरम्यान युद्धग्रस्त युक्रेनमध्ये एक नवीन संकट उभं राहिलं आहे. या नव्या संकटाच्या कचाट्यात तब्बल 42 लाख युक्रेनियन नागरिक अडकले आहेत. रशियाने ताबा मिळवलेल्या युक्रेनच्या भागातील एका मोठ्या धरणाची (Dnipro River Dam) भिंत मंगळवारी (6 जून 2023 रोजी) फुटली. त्यामुळे या परिसरामध्ये आणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे. या मोठ्या धरणाची भिंत फुटल्याने 42 हजारांहून अधिक नागरिक संकटात अडकले आहेत. हजारो नागरिकांचे स्थलांतर सुरू झाले असून ही भिंत फुटल्याने झापोरीझ्झिया अणुऊर्जा प्रकल्पही धोक्यात आल्याचं सांगितलं जात आहे. हे…

Read More