( प्रगत भारत । pragatbharat.com) Uttarakhand Clodburst Rain News : महाराष्ट्रातील (Konkan Rain) कोकण आणि विदर्भ भागात पावसानं धुमाकूळ घातलेला असतानाच आता देशभरातही अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. जिथं पावसामुळं अनेक राष्ट्रीय महामार्गांवरील वाहतुकीवर परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वीत हिमाचल प्रदेशात पावसामुळं नद्यांचे प्रवाह दुप्पट ताकदीनं वाहताना दिसले. ज्यानंतर आता उत्तराखंडमध्ये निसर्ग पुन्हा कोपल्यामुळं वाताहात झाल्याचं स्पष्ट होत आहे. शुक्रवारी रात्रीपासूनच उत्तराखंडमध्ये पावसानं जोर धरला. ज्यामुळं राज्यातील नद्यांचे प्रवाह आणि पाणीपातळी वाढली. राज्याच्या बहुतांश भागांमध्ये ढगफुटीसदृश पाऊस झाल्यामुळं राष्ट्रीय महामार्गांवर दरड कोसळण्याच्याही घटना घडल्या. पिथौरगढ येथे बंगापानी भागात…
Read More