Less Working Hours In These Countries People Only Work 29 Hours Every Week Three Days Week Off Narayana Murthy Remark

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Working Hours: इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती (Narayana Murthy) यांनी भारतीय तरुणांना आठवड्यातून 70 तास काम करण्याचा सल्ला दिला, त्यानंतर कामाच्या तासांवरुन बराच वाद निर्माण झाला. सोशल मीडियावर कामाच्या तासांवरुन नव्या वादाला तोंड फुटलं आहे. 7 दिवसांत कोणी 70 तास काम कसं करू शकतं? असे प्रश्न अनेक लोक विचारू लागले आहेत. असं करणाऱ्यालाची स्थिती कामाला जुंपलेल्या बैलासारखी होईल असं लोक म्हणू लागले.

जगभरातील इतर देशांत मात्र कामाचे तास हे फार कमी आहेत. अशात, भारतीय तरुणांनी पाश्चिमात्य जगाकडून चांगल्या सवयी घेतल्या पाहिजेत, चुकीच्या नाही, असंही नारायण मूर्ती यांनी म्हटलं. दरम्यान, कोणच्या देशांत कामाचे तास सर्वात कमी आहेत? याबद्दल जाणून घेऊया.

फक्त 29 तास काम

जगात असेही काही देश आहेत, जिथे लोक आठवड्यातून फक्त काही दिवसच काम करतात आणि उरलेल्या दिवसात त्यांना विश्रांती दिली जाते. गेल्या काही दिवसांपासून कामाच्या तासांबाबत सतत वाद सुरू आहेत. असं असताना जगात असे अनेक देश आहेत, ज्यांनी चांगल्या उत्पादनासाठी (Good Productivity) तीन आठवड्यांच्या सुट्टीची संस्कृती (3 Week Off Culture) स्वीकारली आहे.

या यादीत नेदरलँड (Netherland) अव्वल स्थानावर आहे, जिथे लोक आठवड्यातून फक्त 29 तास काम करतात. जगात दर आठवड्याला सर्वात कमी काम करणारे लोक या देशात राहतात. नेदरलँडमध्ये लोक आठवड्यातून सरासरी फक्त 4 दिवस काम करतात. अनेक खासगी कंपन्या आणि सरकारी संस्थाही याच सूत्राखाली काम करतात. याबाबत कोणताही कायदा केला नसला तरी लोक या नियमाचं पालन करतात.

या देशांमध्येही कामाचे तास कमी

नेदरलँडनंतर डेन्मार्क (Denmark) देश दुसऱ्या क्रमांकावर आहे, जिथे लोक आठवड्यातून सरासरी 33 तास काम करतात. विशेष म्हणजे येथेही कामाच्या तासांबाबत असा कोणताही कायदा नाही, असं असूनही बहुतांश लोक केवळ 4 दिवस ऑफिसला जातात आणि त्यांना 3 दिवसांची सुट्टी असते.

बेल्जियमनेही (Belgium) नुकताच आठवड्यातून चार दिवस काम करण्याचा नियम काढला आहे, ज्यामध्ये प्रत्येकाला दिवसातून 10 तास काम करावं लागतं. म्हणजे जर तुम्ही चार दिवस दिवसातून 10 तास काम केलं तर तुम्हाला आठवड्यातून 3 दिवस सुट्टी मिळेल. अशा कामाच्या पद्धतीचं (Work Culture) जगभरातून कौतुक होताना दिसत आहे.

नारायण मूर्ती नेमकं काय म्हणाले?

इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी भारताच्या प्रगतीसाठी युवकांनी उत्पादकता वाढवली पाहिजे आणि कठोर परिश्रम केले पाहिजे, असं म्हटलं. यासाठी भारतीय तरुणांनी दर आठवड्याला 70 तास काम केलं पाहिजे, असंही ते म्हणाले. भारतीय युवकांना विनंती आहे की त्यांनी हा देश माझा आहे, मला 70 तास काम करायचं आहे, असं म्हणावं, असं नारायण मूर्ती म्हणाले. भारतीय तरुणांनी पाश्चिमात्य जगाकडून चांगल्या सवयी घेतल्या पाहिजेत आणि वाईट नको, असंही मूर्ती म्हणाले. देशाला वर्क कल्चर बदलण्याची गरज आहे. शिस्त, कठोर मेहनत आणि दृढ निश्चय आवश्यक आहे, तरच देश प्रगती करू शकतो, असं ते म्हणाले.

हेही वाचा:

Qatar: वन नाईट स्टँड केल्यास 7 वर्षांचा तुरुंगवास; कतारमध्ये रोमान्सबाबत आहेत कडक नियम

[ad_2]

Related posts