उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचा झटका, 3.0 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

( प्रगत भारत । pragatbharat.com) भूकंपाच्या बाबतीत अत्यंत संवेदनशील असणारा उत्तराखंडचा उत्तरकाशी जिल्हा पुन्हा एकदा भूकंपाने हादरला आहे. सोमवारी सकाळी जवळपास 8 वाजून 35 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने (NCS) दिलेल्या माहितीनुसार, हा भूकंप 3.0 रिश्टर स्केल तीव्रतेचा होता. या भूकंपात कोणतंही नुकसान झालं असल्याची माहिती समोर आलेली नाही. पण भूकंपामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीती आहे. भूकंपाचे धक्के जाणवताच लोक घाबरुन घराबाहेर आले होते. भूकंपाचं केंद्र हिमालच प्रदेशला लागून असणाऱ्या मोरी ब्लॉकच्या कोठीगाड क्षेत्रात जमिनीच्या पाच किमी खाली होतं.  फक्त याच वर्षाबद्दल बोलायचं गेल्यास उत्तरकाशीमध्ये अनेक वेळा भूकंप…

Read More

तुटून पडणारे डोंगर अन् कोलमडणाऱ्या इमारती…; हिमाचल- उत्तराखंडमध्ये वरुणराजाच ठरतोय काळ; दृश्य पाहून बसेल धक्का

( प्रगत भारत । pragatbharat.com) Uttarakhand, Himachal Rain : महाराष्ट्रात पावसानं काहीशी विश्रांती घेतलेली असतानाच तिथं देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये मात्र पाऊस धुमाकूळ घालताना दिसत आहे. आयएमडी, अर्थात भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पुढील चार दिवस अतीवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर बहुतांश भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह, मेघगर्जनेत पाऊस बरसणार आहे. उत्तराखंडमध्ये 19 20 तारखेपर्यंत पाऊस थैमान घालणार आहे.  सध्याच्या घडीला समोर आलेल्या माहितीनुसार हिमाचलमध्ये पावसामुळं नद्यांना उधाण आलं असून, पूरस्थिती कायम आहे. आतापर्यंत इथं विविध भागांमध्ये पुरामुळं 71 जणांचा मृत्यू ओढावला आहे. तर, तब्बल 10 हजार कोटी रुपयांची…

Read More

रात्र वैऱ्याची! उत्तराखंडमध्ये ढगफुटीमुळं रस्ता वाहून गेला, ठिकठिकाणी भूस्खलन; पावसामुळं वाताहात

( प्रगत भारत । pragatbharat.com) Uttarakhand Clodburst Rain News : महाराष्ट्रातील (Konkan Rain) कोकण आणि विदर्भ भागात पावसानं धुमाकूळ घातलेला असतानाच आता देशभरातही अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. जिथं पावसामुळं अनेक राष्ट्रीय महामार्गांवरील वाहतुकीवर परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वीत हिमाचल प्रदेशात पावसामुळं नद्यांचे प्रवाह दुप्पट ताकदीनं वाहताना दिसले. ज्यानंतर आता उत्तराखंडमध्ये निसर्ग पुन्हा कोपल्यामुळं वाताहात झाल्याचं स्पष्ट होत आहे.  शुक्रवारी रात्रीपासूनच उत्तराखंडमध्ये पावसानं जोर धरला. ज्यामुळं राज्यातील नद्यांचे प्रवाह आणि पाणीपातळी वाढली. राज्याच्या बहुतांश भागांमध्ये ढगफुटीसदृश पाऊस झाल्यामुळं राष्ट्रीय महामार्गांवर दरड कोसळण्याच्याही घटना घडल्या.  पिथौरगढ येथे बंगापानी भागात…

Read More

VIDEO : त्राहिमाम! मनिकरण साहिबकडे जाणारा पूल वाहून गेला; हिमाचल, उत्तराखंडमध्ये पुन्हा निसर्ग कोपला

( प्रगत भारत । pragatbharat.com) Himachal Pradesh Uttarakhand Rain : गेल्या तीन दिवसांपासून सुरु असणाऱ्या पावसानं हिमाचल प्रदेश, उत्तराखंडसोबतच दिल्ली, हरियाणा भागालाही झोडपलं आहे. सातत्यानं सुरु असणाऱ्या पावसामुळं हिमाचलमधील अनेक नद्यांन धोक्याची पातळी ओलांडली असून, आता त्या नद्यांनी रौद्र रुप धारण केल्याचं पाहायला मिळत आहे. वाटेत येईल ती गोष्ट प्रवाहात समामावून घेत या नद्या सध्या अतिप्रचंड वेगानं प्रवाहित झाल्याचं पाहायला मिळत आहे.  अतीमुसळधार पावसामुळं हिमाचल प्रदेशात जलप्रलय आला आहे. येत्या काही काळासाठी इथं हीच परिस्थिती कायम राहणार असून, पुढील तीन दिवसांसाठी या भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आगे. तर,…

Read More