Weather Update : हिमाचल, उत्तराखंड, काश्मीर वगळता देशात विचित्र हवामान; पाहा नेमकी परिस्थिती काय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Weather Update : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण होऊन त्याचं चक्रीवादळात रुपांत होण्याची शक्यता वर्तवण्यात आली. आयएमडीनं वर्तवलेल्या शक्यतेनुसार प्रथमत: हे वादळ मुंबई आणि गुजरातच्या दिशेनं येईल असा इशारा देण्यात आला होता, पण या वादळानं दिशा बदलली आणि शहरावरचं संकट टळलं.  कमी दाबाच्या पट्ट्यामुळं मागील 24 तासांमध्ये अंदमान, निकोबार, तामिळनाडू आणि केरळात, पावसानं अंशत: हजेरी लावली. तर, इथं महाराष्ट्रात ऑक्टोबर हिटचा तडाखा वाढताना दिसला. पुढील काही दिवसांसाठीसुद्धा महाराष्ट्रात हवामानाची अशीच परिस्थिती राहणार असून, मधूनच काही ठिकाणी परतीच्या पावसाच्या तुरळक…

Read More

तुटून पडणारे डोंगर अन् कोलमडणाऱ्या इमारती…; हिमाचल- उत्तराखंडमध्ये वरुणराजाच ठरतोय काळ; दृश्य पाहून बसेल धक्का

( प्रगत भारत । pragatbharat.com) Uttarakhand, Himachal Rain : महाराष्ट्रात पावसानं काहीशी विश्रांती घेतलेली असतानाच तिथं देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये मात्र पाऊस धुमाकूळ घालताना दिसत आहे. आयएमडी, अर्थात भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पुढील चार दिवस अतीवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर बहुतांश भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह, मेघगर्जनेत पाऊस बरसणार आहे. उत्तराखंडमध्ये 19 20 तारखेपर्यंत पाऊस थैमान घालणार आहे.  सध्याच्या घडीला समोर आलेल्या माहितीनुसार हिमाचलमध्ये पावसामुळं नद्यांना उधाण आलं असून, पूरस्थिती कायम आहे. आतापर्यंत इथं विविध भागांमध्ये पुरामुळं 71 जणांचा मृत्यू ओढावला आहे. तर, तब्बल 10 हजार कोटी रुपयांची…

Read More

VIDEO : त्राहिमाम! मनिकरण साहिबकडे जाणारा पूल वाहून गेला; हिमाचल, उत्तराखंडमध्ये पुन्हा निसर्ग कोपला

( प्रगत भारत । pragatbharat.com) Himachal Pradesh Uttarakhand Rain : गेल्या तीन दिवसांपासून सुरु असणाऱ्या पावसानं हिमाचल प्रदेश, उत्तराखंडसोबतच दिल्ली, हरियाणा भागालाही झोडपलं आहे. सातत्यानं सुरु असणाऱ्या पावसामुळं हिमाचलमधील अनेक नद्यांन धोक्याची पातळी ओलांडली असून, आता त्या नद्यांनी रौद्र रुप धारण केल्याचं पाहायला मिळत आहे. वाटेत येईल ती गोष्ट प्रवाहात समामावून घेत या नद्या सध्या अतिप्रचंड वेगानं प्रवाहित झाल्याचं पाहायला मिळत आहे.  अतीमुसळधार पावसामुळं हिमाचल प्रदेशात जलप्रलय आला आहे. येत्या काही काळासाठी इथं हीच परिस्थिती कायम राहणार असून, पुढील तीन दिवसांसाठी या भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आगे. तर,…

Read More