अभिमानास्पद! …अन् 14000 फुटांवरुन मराहाष्ट्राच्या हिमांशु साबळेनं G20 झेंड्यासहीत मारली उडी!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Skydive In Russia With G20 Flag: महाराष्ट्रातील वाशीम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील हिमांशु साबळे सध्या दिल्लीत होत असलेल्या जी-20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर चर्चेचा विषय ठरत आहे. साहसी मोहिमांमध्ये सहभागी होऊन अटकेपार झेंडा फडकविणार साहसी व्यक्ती अशी हिमांशुची ओळख आहे. त्याने जी-20 निमित्त अशीच एक खास कामगिरी केली आहे. नेमकं केलं काय? नवी दिल्लीमध्ये आज म्हणजेच 9 सप्टेंबर आणि उद्या म्हणजेच 10 सप्टेंबर 2023 दरम्यान G20 शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. भारताला पहिल्यांदाच या परिषदेचं यजमानपद मिळालं आहे. या परिषदेनिमित्त भारत सध्या जगभरातील राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे. संपूर्ण…

Read More