Central Government Hikes Domestic Natural Gas Price May Affect Prices Of Cng Png New Rates Applicable From 1 Oct 2023

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली :  ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच सामान्यांना महागाईचा (Inflation) चटका बसण्याची शक्यता आहे. सरकारने नैसर्गिक वायूच्या (Natural Gas Price) किंमतीत वाढ केली आहे. त्यामुळे आता नैसर्गिक वायूची किंमत 8.60 डॉलर प्रति MMBTU हून 9.20 प्रति MMBTU  इतकी झाली आहे. सरकारने शनिवार, 30 सप्टेंबर रोजी एका नोटिफिकेशन द्वारे ही माहिती दिली आहे. नवीन दर हे रविवार, 1 ऑक्टोबर 2023 ते 31 ऑक्टोबर 2023 दरम्यान लागू असणार आहेत. 

सलग दुसऱ्या महिन्यात केंद्र सरकारने नैसर्गिक वायूच्या किंमतीत वाढ केली आहे. याआधी देखील सप्टेंबर महिन्यात नैसर्गिक वायूच्या किंमतीत 7.85 डॉलरहून 8.60 डॉलर इतके दर करण्यात आले होते. 

सामान्य लोकांवर होणार परिणाम…

नैसर्गिक वायूच्या किमतीत वाढ झाल्याचा थेट परिणाम खत, उर्जा क्षेत्र, स्टील पेट्रोकेमिकल अशा अनेक क्षेत्रांच्या खर्चावर होईल. यासोबतच सर्वसामान्यांना महागाईचाही फटका बसू शकतो. या वाढीनंतर सीएनजी आणि पीएनजीच्या दरातही वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. असे झाल्यास सर्वसामान्यांचा खिसा रिकामा होण्याची शक्यता आहे.

सामान्य नागरीक आधी पासूनच महागाईने त्रस्त आहेत. टोमॅटोसह भाज्यांच्या वाढलेल्या दरामुळे लोकांच्या नाकी नऊ आले होते. आता, बाजारात टोमॅटोचे दर कमी झाले असताना दुसरीकडे कांद्याचे दर वाढू लागले आहेत. त्यातच आता पुन्हा महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे. 

दर कसे निश्चित होतात…

रशिया, अमेरिका, संयुक्त अरब अमिराती आणि कतार या देशांकडून भारत नैसर्गिक वायू खरेदी करतो. हे देश ओएनजीसीला द्रवरूप नैसर्गिक वायूचा पुरवठा करतात. त्यानंतर देशभरात त्याचा पुरवठा केला जातो. सरकारने नैसर्गिक वायूचे दरही मासिक आधारावर ठरवण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी, आंतरराष्ट्रीय किमतीच्या आधारावर सहा महिन्यांसाठी किंमत निश्चित केली जात होती, परंतु ऑक्टोबर 2022 मध्ये सरकारने नियम बदलले आणि मासिक आधारावर दर निश्चित करण्याचा निर्णय घेतला.

PNG आणि CNG मधील फरक

दरम्यान पीएनजी आणि सीएनची हे दोन्ही नैसर्गिक वायू असले तर या दोघांमध्ये काहीसा फरक आहे. सीएनजी म्हणजेच कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस आहे आणि पीएनजी म्हणजे पाईप्ड नॅचरल गॅस. सीएनजी आणि पीएनजी दोन्ही नैसर्गिक वायू आहेत. मात्र सीएनजी वापरण्यासाठी 200 बारपर्यंत योग्य दाब आवश्यक आहे तर पीएनजीसाठी 4 बार ते 21 मिली बारपर्यंत दाब आवश्यक असतो.

LPG म्हणजे काय?

एलपीजीचा फुलफॉर्म लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस असा आहे. हा वायू प्रोपेन, प्रोपलीन, ब्युटेन आणि ब्यूटिलीन यांसारख्या अनेक वायूंचे मिश्रण आहे. हे पेट्रोलियम शुद्धीकरणाचे उप-उत्पादन म्हणून एलपीजी तयार केला जातो. एलपीजी हा नैसर्गिक वायूपेक्षा वेगळा असतो. एलपीजी हवेपेक्षा जड असतो. या गॅसचा वापर स्वयंपाकासाठी, वाहनांसाठी इंधन म्हणून आणि मोटर चालवण्यासाठी केला जातो.

[ad_2]

Related posts