( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडा येथील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 28 वर्षीय तरुणाने एका भटक्या कुत्रीसह अनैसर्गिक कृत्य केलं आहे. संतापजनक बाब म्हणजे, ही कुत्री गर्भवती आहे. पोलिसांनी या आरोपी तरुणाला अटक केली आहे. आरोपी तरुणाने फक्त अनैसर्गिक कृत्यच केलं नाही, तर तिला घराच्या तिसऱ्या माळ्यावरुन खाली फेकून दिलं. ही घटना समोर आल्यानंतर नागरिक संताप व्यक्त करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री आरोपीने हे कृत्य केलं. आरोपी कुत्रीवर बलात्कार करत असतानाच एका शेजाऱ्याने त्याला पाहिल्याने घटना उघडकीस आली. यानंतर त्याच्या घराबाहेर गर्दी जमा…
Read More