सामूहिक विवाह सोहळ्यात भलताच प्रकार; चक्क बहिणीने भावासोबत केले लग्न

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral News: उत्तरप्रदेशच्या महरागंज जिल्ह्यात मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. भावा-बहिणीनेच सामुहिक विवाह सोहळ्यात सात फेरे घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. अधिकाऱ्यांना या प्रकाराबाबत कळताच मोठा गदारोळ माजला आहे.  मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेंतर्गंत सरकारकडून लग्नानंतर काही रक्कम दिली जाते. तसंच, संसारपयोगी सामानही दिले जाते. यासाठीच मध्यस्थाने भावा-बहिणींनीच एकमेकांशी लग्न केले. हा प्रकार समोर आल्यानंतर क्षेत्र विकास अधिकारी (BDO) यांनी विवाहनंतर देण्यात येणारे संसारोपयोगी सामान पुन्हा परत मागवले आहे. त्याचबरोबर अनुदान म्हणून दिल्या जाणाऱ्या 35 हजार रुपयांच्या रकमेवरही निर्बंध लावण्यात आले आहेत. …

Read More