[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Haryana Accident : हरियाणाच्या महेंद्रगडमध्ये भीषण अपघात, स्कूल बस उलटल्याने सहा मुलांचा मृत्यू तर 15 जखमी
हरियाणाच्या महेंद्रगडमध्ये भीषण अपघात झाला. स्कूल बस उलटल्याने सहा मुलांचा मृत्यू झाला तर १५ जण जखमी झाले आहे. त्यांना उपचारांसाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनातील अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. ओव्हरटेक करताना अपघात झाल्याचं कळतं. चालक मद्यधुंद अवस्थेत होता, असा दावा घटनास्थळावर उपस्थितांनी केला. महेंद्रगडच्या कनीनामध्ये असलेल्या जीएलपी या खासगी शाळेची ही बस होती. आज रमजान ईदच्या निमित्ताने सर्व सरकारी कार्यालयं आणि शाळांना सुट्टी आहे. मात्र तरीही या खासगी शाळांना सुट्टी नव्हती.
[ad_2]