[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
नवी दिल्ली: पक्ष फोडणाऱ्यांना मोठी किंमत मोजावी लागणार असल्याचा इशारा राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar) दिला आहे. आम्ही जनतेमध्ये जाणार असून जनतेवर पूर्ण विश्वास असल्याचं ते म्हणाले. खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) आणि सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांचे राष्ट्रवादीतून निलंबन करण्यात आलं असून तशी घोषणा दिल्लीतील राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर करण्यात आली. तसेच ज्या नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली (Sharad Pawar Vs Ajit Pawar) होती त्यांनाही पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय बैठकीत आज आठ प्रस्ताव पारित करण्यात आले आहेत.
जर राष्ट्रवादीच्या विचारधारेच्या विरोधात कुणी जात असेल तर त्याला निलंबित करण्याचा अधिकार राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांना असल्याचं या बैठकीत स्पष्ट करण्यात आलं. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा शरद पवारांवर पूर्ण विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
राष्ट्रवादीच्या नव्या अध्यक्षांच्या नियुक्तीच्या बातमीत काहीही तथ्य नसून मीच राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचं शरद पवार म्हणाले. त्यामुळे कुणी काही नियुक्त्या केल्या तर त्याला काहीही अर्थ राहणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. आमचा निवडणूक आयोगावर विश्वास असून आयोगासमोर आम्ही आमची बाजू मांडू असं शरद पवारांनी माध्यमांना सांगितलं.
Sharad Pawar On Ajit Pawar CM : अजितदादांना मुख्यमंत्री व्हायचंय…
अजित पवारांना मुख्यमंत्री व्हायचं आहे या प्रश्नावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, कुणाला काय व्हायचंय याच्याशी मला काही घेणं-देणं नाही.
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आज पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची दिल्लीत पहिल्यांदाच बैठक पार पडली. त्यानंतर शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या आधी बुधवारी अजित पवार हेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष असतील असा ठराव राष्ट्रवादीच्या अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती आहे.
अजित पवारांचा पक्षावर आणि चिन्हावर दावा
अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादी आणि पक्षचिन्हावर दावा केला होता. त्यांनी निवडणूक आयोगामध्ये धाव घेत तशा आशयाचं पत्रही दाखल केलं आहे.
[ad_2]