Congress Rahul Gandhi Will Shift To Former Delhi Cm Sheila Dikshit Residence

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत नव्या घराच्या शोधात असलेल्या राहुल गांधी यांना अखेर घर (Rahul Gandhi New House) मिळालं आहे. दक्षिण दिल्लीतील निझामुद्दीन पूर्वमध्ये असलेल्या थ्री बीएचके घरामध्ये त्यांचा मुक्काम आहे. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शिला दीक्षित ( Delhi Former CM Sheila Dikshit) यांच्या मालकीचं हे घर असून त्यांच्या आयुष्यातील अखेरचे दिवस या निवासस्थानी घालवले होते. 

दोन वर्षांसाठी खासदारकी रद्द (Rahul Gandhi Disqualification) झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 22 एप्रिल रोजी त्यांचे दिल्लीतील घर रिकामं केलं होतं. त्यांनंतर ते घराच्या शोधात होते. तात्पुरते ते त्यांच्या आई म्हणजे काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी राहत होते. 

दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शिला दीक्षित ( Delhi Former CM Sheila Dikshit) यांचे जुलै 2019 मध्ये निधन झालं होतं. त्यावेळी राहुल गांधी यांनी त्यांच्या नातेवाईकांची भेट घेतली होती. शिला दीक्षित त्यांच्या शेवटच्या दिवसांमध्ये या घरी राहत होत्या. हे घर थ्री बीएचके असून एकूण 1500 स्क्वेअर फूट असल्याची माहिती आहे. 

शिला दीक्षित या दिल्लीच्या तीन वेळा मुख्यमंत्री राहिल्या होत्या. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र आणि दिल्लीचे माजी खासदार संदीप दीक्षित हे या घरात राहत होते. आता राहुल गांधी या घरी राहायला येणार असल्याने संदीप दीक्षित यांनी हे घर रिकामं केल्याची माहिती आहे. राहुल गांधी या ठिकाणी भाड्याने राहणार आहेत. 

मोदी आडनावाची बदनामी केल्याचा ठपका ठेऊन गुजरात न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांच्यावर कारवाई करत त्यांची खासदारकी रद्द (Rahul Gandhi Disqualification) केली. त्यामुळे राहुल गांधी राहत असलेले 12 तुघलक लेनवरील घर त्यांना रिकामं करावं लागलं. त्यानंतर राहुल गांधी हे 10 जनपथ रोड या सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी राहायला गेले होते. 

राहुल गांधी यांना दिलासा देण्यास उच्च न्यायालयाचा नकार

राहुल गांधी यांना गुजरात सत्र न्यायालयाने मोदी आडनावाच्या बदनामीप्रकरणी दोन वर्षाची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती. त्यानंतर राहुल गांधी यांनी गुजरात उच्च न्यायालयात धाव घेतली. पण उच्च न्यायालयाने त्यांना कोणताही दिलासा दिला नाही.  

ही बातमी वाचा: 

 

[ad_2]

Related posts