[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
किडनी स्टोनचे प्रकार?
किडनी स्टोनचे अनेक प्रकार आहेत आणि सर्वात सामान्य म्हणजे कॅल्शियम स्टोन. आपल्या मूत्रपिंडात मोठ्या प्रमाणात कॅल्शियम ऑक्सलेट जमा झाल्यामुळे हे खडे तयार होतात. ऑक्सलेट हा नैसर्गिकरित्या आढळणारा पदार्थ आहे जो विविध प्रकारच्या भाज्या आणि फळांमध्ये आढळतो.
शिवाय, आपले यकृत देखील दररोज विशिष्ट प्रमाणात कॅल्शियम तयार करते. आपली हाडे आणि स्नायू रक्तातून कॅल्शियम शोषून घेतात, परंतु जेव्हा या पोषक तत्वाचे प्रमाण रक्तात जास्त होते तेव्हा ते मूत्रासोबत बाहेर फेकण्यासाठी मूत्रपिंडात जाते. काही वेळा मूत्रपिंड शरीरातून अतिरिक्त कॅल्शियम काढू शकत नाहीत, जे हळूहळू जमा होऊ लागते आणि दगडाचा आकार घेते.
टोमॅटोमध्ये ऑक्सलेटचे प्रमाण जास्त असते आणि त्यामुळे मुतखड्याच्या निर्मितीशी त्याचा संबंध येतो.
(वाचा – इन्सुलिन किंवा औषधांशिवाय १५ वर्षापूर्वीचा डायबिटिसही राहिल कंट्रोलमध्ये, बाबा रामदेव यांनी सांगितला फॉर्म्युला)
टोमॅटो खाल्ल्यामुळे मुतखडा होतो का?
टोमॅटो हा प्रत्येक भारतीय जेवणाचा सर्वात महत्वाचा भाग मानला जातो. टोमॅटोमध्ये असलेले पोषक तत्व आणि गुणधर्म देखील शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत.
यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, फायबर, पोटॅशियम आणि प्रथिने यांसारख्या पोषक तत्वांचा पुरेसा प्रमाण आरोग्य राखण्यास मदत करतो. प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात टोमॅटोचा वापर कोणत्या ना कोणत्या प्रकारे केला जातो. पण असे म्हणतात की टोमॅटो खाल्ल्याने किडनी स्टोन होऊ शकतो.
काही लोकांचा असा विश्वास आहे की टोमॅटोच्या बिया खाल्ल्याने तुम्हाला किडनी स्टोन होऊ शकतो. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, मुतखडा छोटासा होऊ शकतो.
(वाचा – चतुर्मासात ऋजुता दिवेकरच्या या Monsoon Food Guide करा फॉलो, सुदृढ आणि निरोगी राहाल)
सत्य काय
जर तुम्हाला तुमच्या जेवणात टोमॅटो घालणे आवडत असेल तर तुम्ही कोणत्याही चर्चांकडे लक्ष देऊ नका. टोमॅटोमध्ये ऑक्सलेट असते, परंतु त्याचे प्रमाण खूपच कमी असते आणि त्यामुळे किडनी स्टोन तयार होत नाही. 100 ग्रॅम टोमॅटोमध्ये फक्त 5 ग्रॅम ऑक्सलेट असते.
जर टोमॅटो इतके हानिकारक असेल तर ज्या लोकांना किडनी स्टोनचे निदान झाले आहे त्यांनी त्याचे सेवन पूर्णपणे टाळण्याचा सल्ला दिला असता. जर तुम्ही निरोगी असाल आणि किडनीची समस्या नसेल तर तुमच्या आवडीनुसार टोमॅटो खाणे चांगले.
जर तुम्हाला किडनीशी संबंधित काही समस्या असतील तर तुमचे ऑक्सलेटचे सेवन मर्यादित करा. पालक, बीन्स, बीटरूटमध्येही ऑक्सलेटचे प्रमाण जास्त असते. या भाज्या खाण्यापूर्वी व्यवस्थित शिजवा.
(वाचा – ट्रे़डमिलवर धावताना कोसळला; अतिशय धक्कादायक असा २४ वर्षीय इंजिनीअरचा मृत्यू, Gym Safety किती महत्वाची
स्टोन होऊ नये म्हणून काय काळजी घ्याल
- दररोज किमान 2 लिटर पाणी प्या. हे तुमच्या किडनीला शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करेल
- सोडियमचे सेवन कमी करा.
- आपल्या आहारात वनस्पती प्रथिने समाविष्ट करा.
- तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणत्याही प्रकारचे सप्लिमेंट्स घेणे टाळा.
(इंग्रजीत हे आर्टिकल वाचण्यासाठी येथे क्लिक करा)
टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.
[ad_2]