Elon Musk Vs Zuckerberg वाद पेटला! समोर आले ‘ते’ मेसेज; एलॉन मस्क म्हणाले, ‘तू पळकुटा’

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Elon Musk vs Mark Zuckerberg Cage Fight: फेसबुकची पालक कंपनी ‘मेटा’चे मुख्य कार्यकारी अध्यक्ष मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांनी ट्वीटरचे मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांच्याविरुद्धच्या बॉक्सिंग सामना रद्द होणार असल्याचं म्हटलं आहे. “आपण सर्वांना पुढे निघायला हावं,” असं म्हणत झुकरबर्गने बंद पिंजऱ्यातील सामना होणार नाही असे स्पष्ट केलं आहे. झुकरबर्ग यांनी थ्रेड या सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमध्ये हे म्हटलं आहे.

काय म्हटलंय झुकरबर्ग यांनी?

एलॉन मस्क निव्वळ टाळाटाळ करत असून ते याबद्दल गंभीर नाहीत असं मार्क झुकरबर्गने म्हटलं आहे. “मला वाटतं आपल्या सगळे या गोष्टीशी सहमत असू की एलॉन मस्क हा (पिंजऱ्यातील बॉक्सिंग) फार गांभीर्याने बोलत नाहीय. मी थेट तारखेसहीत पोस्ट केली होती. डेना व्हाइट यांनी या सामन्यामधून पैसा जमवून तो समाज उपयोगी कार्यांसाठी देण्याची व्यवस्थाही केली होती. एलॉनने तारखेबद्दल काही सांगितलं नाही. नंतर त्याने शस्त्रक्रीया करावी लागेल असं म्हटलं. आता तो माझ्या घराच्या अंगणामध्ये सराव सामना घेण्याची विनंती करतोय. जर मस्क खरोखरच याबद्दल गांभीर्याने विचार करणार असेल आणि तारीख सागणार असेल तर माझ्याशी संपर्क कसा करावा हे त्याला ठाऊक आहे. नाहीतर आपण सर्वांनी आता यामधून पुढे गेलं पाहिजे. जे लोक हा खेळ गांभीर्याने घेतात त्यांच्याविरोधात मी लढेन,” असं मार्क झुकरबर्ग यांनी म्हटलं आहे.

कथित चॅट्स आले समोर

मस्क आणि मार्क या दोघांमधील मेसेजवरील चर्चाही समोर आली आहे. या दोघांमधील कथित चर्चेचे स्क्रीनशॉटही व्हायरल झालेत.

एलॉन मस्क यांचा पलटवार

झुकरबर्ग यांनी केलेल्या या पोस्टच्या स्क्रीनशॉटवर मस्क यांनी प्रतिक्रिया नोंदवली आहे. ट्वीटरवरुन (एक्सवरुन) प्रतिक्रिया नोंदवताना मस्क यांनी झुकरबर्ग यांना ‘चिकन’ असं म्हटलं आहे. म्हणजेच झुकरबर्ग हा पळकुटा आहे अशी खोचक प्रतिक्रिया मस्क यांनी नोंदवली आहे.

दोघामधील वाद चव्हाट्यावर

याच वर्षी जुलै महिन्यामध्ये लॉन्च झालेल्या ‘मेटा’च्या मालकीच्या ‘थ्रेड’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला उत्तम प्रतिसाद मिळू लागल्यानंतर 52 वर्षीय मस्क आणि 39 वर्षीय झुकरबर्ग यांचा वाद सोशल मीडियावर चांगलाच तापला. मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांनीच काही दिवसांपूर्वी मस्क यांच्याविरोधात लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर मागील आठवड्यात आपल्याला शस्त्रक्रीयेची गरज असल्याचं म्हटलेलं. आता मात्र मार्क यांनी निव्वळ कारणं देत मार्क सामना टाळत असल्याचं म्हटलं आहे. 

मार्क जू-जीत्सू शिकलेत

मार्क झुकरबर्ग यांनी कोरोना साथीच्या कालावधीमध्ये हौस म्हणून कराटेप्रमाणे जपानमध्ये खेळला जाणारा जू-जीत्सू हा सेल्फ डिफेन्सचा प्रकार शिकला. तो ब्राझीलमधील जू-जीत्सूच्या पहिल्या स्पर्धेमध्ये जिंकला होता. मार्क झुकरबर्ग यांनी आपल्या इन्स्ताग्राम अकाऊंटर जू-जीत्सूचा सराव करत असल्याचा व्हिडीओ पोस्ट केला होता. आपण पुढच्या स्पर्धेसाठी तयारी करत असल्याचं मार्क यांनी या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटलं होतं.

मस्क मार्शल आर्ट्सचे विद्यार्थी

विशेष म्हणजे मस्क हे सुद्धा मार्शल आर्ट शिकले आहेत. त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना मार्शल आर्टच्या सामन्यासाठी यापूर्वीच आव्हान दिलं होतं. फेब्रुवारी 2022 मध्ये रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर मार्च महिन्यामध्ये मस्क यांनी ट्वीटरवरुनच पुतिन यांनी एकच सामना होऊन जाऊ द्या आपल्यात असं म्हणत त्यांना आव्हान दिलं होतं. त्यावेळीही मस्क यांच्या या आव्हानाची चांगलीच चर्चा झाली होती.

Related posts