2000 Rupee Notes 4 Days Only Left For Exchange Or Deposit Of 2000 Rupee Note

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

2000 Rupee Notes: तुमच्याकडे जर 2000 रुपयांच्या नोटा असतील तर त्या लवकर बदलून घ्या. कारण 2000 रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी अवघे चारच दिवस शिल्लक राहीले आहेत. जर तुम्ही 30 सप्टेंबर 2023 पर्यंत 2000 रुपयांच्या नोटा बदलल्या किंवा जमा केल्या नाहीत तर तुमच्या समस्या आणखी वाढू शकतात. अद्यापही सर्वसामान्य लोकांकडून 2000 रुपयांच्या नोटा येणं बाकी आहे. 24 हजार कोटी रुपयांच्या बँकेत परत येणं बाकी आहे. 

24,000 कोटी रुपयांच्या नोटा अद्याप परत करायच्या बाकी

रिझर्व्ह बँकेने 19 मे 2023 रोजी 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली होती. RBI ने दिलेल्या माहितीनुसार, 31 मार्च 2023 पर्यंत 2000 रुपयांच्या 3.62 लाख कोटी रुपयांच्या नोटा चलनात होत्या. ज्या 19 मे 2023 रोजी 3.56 लाख कोटी रुपयांवर आल्या होत्या. गेल्यावेळी, 1 सप्टेंबर 2023 रोजी, RBI ने नोटा परत करण्याबाबत डेटा जारी केला होता, त्यानुसार 3.32 लाख कोटी रुपयांच्या 2000 च्या नोटा बँकिंग सिस्टममध्ये परत आल्या होत्या. म्हणजेच चलनात असलेल्या एकूण नोटांपैकी 93 टक्के नोटा बँकिंग व्यवस्थेत परत आल्या आहेत. 2000 रुपयांच्या 7 टक्के म्हणजेच 24,000 कोटी रुपयांच्या नोटा अद्याप परत करायच्या आहेत.

30 सप्टेंबरनंतर दोन हजारांच्या नोटा असणाऱ्यांच्या अडचणी वाढू शकतात

2000 च्या नोटा मागे घेण्याची घोषणा करताना RBI ने 30 सप्टेंबर 2023 नंतर देखील 2000 च्या नोटा कायदेशीर राहतील असे सांगितले होते. पण 30 सप्टेंबरनंतर बँका 2,000 रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी स्वीकारतील की नाही करतील हे आरबीआयने सांगितलेले नाही. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत सर्वसामान्यांना दोन हजार रुपयांच्या नोटा बदलून द्याव्यात किंवा जमा कराव्यात, असे आवाहन आरबीआय वारंवार करत आहे. त्यामुळं 30 सप्टेंबरपर्यंत या नोटा बँकांमध्ये परत न आल्यास 30 सप्टेंबरनंतर या नोटा असणाऱ्यांच्या अडचणी वाढू शकतात. रिझव्‍‌र्ह बँकेने 19 मे रोजी अचानकपणे 2000 रुपयांची नोट चलनातून मागे घेण्याची घोषणा केली. परंतु अशी नोटा खात्यात जमा करण्यासाठी किंवा बँकांमध्ये बदलून घेण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली. दोन हजार रुपयांची नोट चलनातून मागे घेणे ही लोकांची गैरसोय टाळण्यासाठी किंवा अर्थव्यवस्थेत कोणताही व्यत्यय टाळण्यासाठी नियोजित चलन व्यवस्थापनाचा एक भाग होता. 

का घेतला निर्णय?

2000 रुपये मूल्याची नोट नोव्हेंबर 2016 मध्ये जारी करण्यात आली. त्या वेळी चलनात असलेल्या सर्व 500 रुपये आणि 1000 रुपयांच्या नोटा एका झटक्यात चलनातून रद्द करण्यात आल्या होत्या. त्यावेळी बाजारातील चलनाची मागणी पूर्ण करण्यासाठी 2000 रुपयांची नोट जारी करण्यात आली होती.  सामान्य व्यवहारांसाठी दोन हजार रुपयांची नोट वापरली जात नसल्याची बाब समोर आली होती. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या “क्लीन नोट पॉलिसी” च्या अनुषंगाने, 2000 रुपये मूल्याच्या बँक नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

Rs 2000 Note : 2000 रुपयांची नोट बदलण्यासाठी मुदतवाढ मिळणार? अर्थ मंत्रालयाने म्हटले….

[ad_2]

Related posts