( प्रगत भारत । pragatbharat.com)
Chanakya Niti: लग्नानंतर पत्नीची पहिली जबाबदारी ही तिच्या पतीबाबत असते. महान नैतिकतावादी आचार्य चाणक्य यांनीही मानवी जीवनाशी संबंधित अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्यांनी वैवाहिक जीवनांसंदर्भात अनेक महत्त्वाच्या गोष्टी नमूद केल्या आहेत. त्यांनी त्यांच्या ग्रथांमध्ये सुखी जीवन जगण्याचा एक मार्ह सांगितला आहे.
चाणक्य नीति व्यवसाय, वैवाहिक जीवन, पैसा आणि आरोग्याशी संबंधित गोष्टींची माहिती देते. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीती ग्रथांमध्ये अशा महिलांबद्दल सांगितलंय, ज्या आपल्या पतीपासून कधीच संतुष्ट नसतात. आजच्या या आर्टिकलमध्ये आम्ही तुम्हाला अशा महिलांबद्दल सांगणार आहोत ज्या पतीबद्दल समाधानी दिसत नाहीत.
जर स्त्रियांना शांत पती मिळाले तर त्या त्यांच्यासोबत फारशा आनंदी नसतात. अनेक वेळा संवाद कमी झाल्यामुळे त्यांचं नातं तुटतं. ज्यावेळी एखादी स्त्री कमी बोलते किंवा शांत राहते तेव्हा तिला तिच्या पतीने तिच्याशी बोलावं असं वाटतं.
जाणून घेऊया अशा महिला पतीशी नसतात संतुष्ट
विश्वासघात
लग्नानंतर अनेक महिला त्यांच्या पतीवर आंधळा विश्वास ठेवतात. यावेळी जर पतीने एकदा का पत्नीचा विश्वास तोडला किंवा दुखावला गेला तर ती पुन्हा विश्वास ठेवू शकत नाही. नात्यात त्यांचा विश्वासघात करणाऱ्या पुरुषांवर स्त्रिया समाधानी नसतात. प्रत्येक वेळी त्यांच्या मनात त्यांच्या पतीबद्दल प्रश्न निर्माण होतात. परिणामी यावेळी नात्यामध्ये शंका निर्माण होऊ लागतात. त्यामुळे प्रत्येक वैवाहिक नात्यात जोडप्यांमध्ये विश्वास असणं गरजेचं होतं.
अधिक प्रमाणात राग-राग करणं
काही महिलांचा स्वभाव अनेकदा रागीट असतो. अशा स्त्रिया आपल्या पतीवर असमाधानी राहतात. छोट्या छोट्या गोष्टीवरून असा जोडप्यांमध्ये भांडणं सुरू होऊ लागतात. परिणामी नात्याला तडा जाऊ लागतो. अशा परिस्थितीत पतीने कितीही प्रयत्न केले तरी पत्नीला ते मान्य होत नाही.
नवऱ्याची काळजी न घेणं
लग्नानंतर पत्नीची पहिली जबाबदारी असते ती पतीची काळजी घेणं. मात्र असं असूनही काही स्त्रिया फक्त स्वतःबद्दल विचार करतात. नात्यामध्ये देखील त्या केवळ स्वतःचा फायदा पाहतात. अशा स्त्रिया आपल्या पतींबद्दल समाधानी नसतात, कारण सर्वत्र त्यांना फक्त स्वतःची काळजी असते. जर अशा पत्नी असतील तर त्यांच्या नात्यात कधीही प्रेम जास्त फुलत नाही.
( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती चाणक्य नीतीशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )