[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
श्रीहरिकोटा : भारतीय अंतराळ संस्था म्हणजेच, इस्रोने (ISRO) चंद्रावर पाठवलेल्या यानाने आणखी एक प्रयोग यशस्वी केला आहे. इस्रोने ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. विक्रम लँडरने (Vikram Lander) कमांडनुसार, आपले इंजिन फायर केले. त्यानंतर स्वत:हून त्याने 30 ते 40 सेंटीमीटरचा प्रवास पूर्ण केला आहे. मागील आठवड्यामध्ये प्रज्ञान रोव्हरच्या (Pradyan Rover) बॅटरी या चार्ज करुन काही काळाची त्याने विश्रांती घेतली आहे. त्यानंतर विक्रम लँडरचा हा एक यशस्वी आणि महत्त्वाचा प्रयोग आहे.
काय म्हटलं इस्रोने?
इस्रोने ट्वीट करत विक्रम लँडरच्या या प्रयोगाविषयी माहिती दिली आहे. यावेळी इस्रोने ट्वीट करत म्हटलं आहे की, “विक्रम लँडर हा त्याच्या उद्दीष्टांच्या दिशेने प्रवास करत आहे. नुकताच विक्रम लँडरने हॉप एक्सपेरीमेंट म्हणजे उडी मारण्याचा प्रयोग यशस्वी केला आहे. कमांड मिळाल्यानंतर विक्रम लँडरने त्याचे इंजिन सुरु केले. त्यानंतर 40 सेंटीमीटरची विक्रम लँडरने उडी मारली आणि 30-40 सेमी अंतर पार केलं.”
विक्रम लँडरच्या या प्रयोगामुळे इस्रोला अनेक महत्त्वपूर्ण योजनांसाठी मदत होणार आहे. तसेच आता चंद्रावर इस्रोला माणूस देखील पाठवण्यास शक्य होणार आहे. पुढील बोलताना इस्रोने म्हटलं आहे की, “विक्रम लँडरमधील सर्व प्रणाली आणि उपकरणं ही सुस्थितीत आहेत. रॅम्प, ChaSTE आणि ILSA ही उपकरणं पुन्हा एकदा दुमडण्यात आली. तर या प्रयोगानंतर विक्रम लँडर पुन्हा एकदा यशस्वी चंद्रावर तैनात करण्यात आलंय.”
Chandrayaan-3 Mission:
🇮🇳Vikram soft-landed on 🌖, again!Vikram Lander exceeded its mission objectives. It successfully underwent a hop experiment.
On command, it fired the engines, elevated itself by about 40 cm as expected and landed safely at a distance of 30 – 40 cm away.… pic.twitter.com/T63t3MVUvI
— ISRO (@isro) September 4, 2023
चंद्रावर विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरचे यशस्वी प्रयोग
ज्या दिवशी चांद्रयानाने चंद्रावर पाऊल ठेवले त्या दिवसापासून विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर हे सकारात्मक कामं करत आहेत. त्यांनी चंद्राची अनेक छायाचित्र देखील पाठवली आहेत. तर प्रज्ञान रोव्हरने त्याचं काम करुन आता काही दिवसांचा ब्रेक घेतलाय. कारण सध्या चंद्रावरचा दिवस मावळला असून आता 14 दिवसानंतर चंद्रावर दिवस उजाडणार आहे. त्यामुळे चंद्रावर एका दिवसाचा कालावधी हा पृथ्वीच्या 14 दिवसांइतका आहे. त्यामुळे चंद्रावर आता रात्र सुरु असल्याने प्रज्ञान रोव्हर देखील झोपी गेले आहे. 14 दिवसांनंतर प्रज्ञान रोव्हर त्याचे काम पुन्हा सुरु करेल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
N Valarmathi: चांद्रयान लाँचिंगला काऊंटडाऊन देणारा आवाज हरपला; ISRO शास्त्रज्ञ एन. वलारमथी यांचं 64 व्या वर्षी निधन
[ad_2]