Isro Chief Salary What Is Salary Of S Somnath Nasa Pay Its Scientists 5 Times Of India Scientist Salary

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ISRO Chief Salary: काही लोक पैसे कमवण्यासाठी नोकरी (Job) करतात, तर काही छंद म्हणून करतात. पण असेही काही लोक आहेत जे देशहितासाठी नोकरी करतात, देशाचं नाव जगात उंचवण्यासाठी नोकरी करतात. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोमधील (ISRO) लोक त्यांचाच एक हिस्सा आहेत. इस्रोच्या शास्त्रज्ञांनी चांद्रयान-3 च्या यशानंतर जगात नाव कमावलं आणि यामुळेच लोक इस्रोमधील वैज्ञानिकांशी संबंधित सर्व गोष्टी इंटरनेटवर शोधत आहेत. यातील एक गोष्ट म्हणजे इस्रो संस्थेत काम करणाऱ्यांचा पगार. याआधी आपण इस्रोमध्ये काम करणाऱ्या शास्त्रज्ञ आणि वैज्ञानिकांच्या पगाराबद्दल (Scientist Salary) जाणून घेतलं होतं, आता इस्रोच्या प्रमुखांचा नेमका किती पगार असतो? हे पाहूया.

देशाला प्रगतीच्या शिखरावर पोहोचायचं असेल तर विज्ञान आणि तंत्रज्ञानात सुधारणा करावी लागेल, असं माजी राष्ट्रपती आणि शास्त्रज्ञ एपीजे अब्दुल कलाम यांनी म्हटलं होतं. त्यावेळी ते इस्रोमध्ये शास्त्रज्ञ म्हणूम काम करत होते. आज इस्रो जगभर प्रसिद्ध आहे. सध्या इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ आहेत, ज्यांचं पूर्ण नाव श्रीधर परिकर सोमनाथ आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने चांद्रयान-3 यशस्वीरित्या चंद्रावर उतरवलं. यानंतर एस. सोमनाथ यांच्या कामाची चर्चा जगभरात होत आहे.

इस्रो प्रमुखांचा नेमका पगार किती?

सध्या इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांचा पगार दरमहा अडीच लाख रुपये आहे. हा पगार 7 व्या वेतन आयोगानुसार लागू होणारा आहे. इस्रो प्रमुखांना पगाराशिवाय केंद्र सरकार इतर अनेक फायदेही देते. जसं घर, कार आणि येण्या-जाण्याचा खर्च. याशिवाय त्यांना वाय प्लस लेव्हल सुरक्षा देखील मिळाली आहे. एम्बिशन बॉक्सच्या मते, नासा आपल्या शास्त्रज्ञांना इस्रोपेक्षा 5 पट जास्त पैसे देते. नासामधील शास्त्रज्ञांना वर्षाला 72,416 डॉलर्स पगार मिळतो, भारतीय रुपयांत बोलायचं झालं तर त्यांचा पगार 57 लाख रुपये आहे.

इस्रोतील इतर शास्त्रज्ञांना किती पगार मिळतो?

जर एखादी व्यक्ती इस्रोमध्ये अभियंता (Engineer) म्हणून रुजू झाली, तर त्याचा प्रारंभिक पगार (Starting Salary) 37,400 ते 67,000 पर्यंत असतो. याउलट, जर तुमची इस्रोमध्ये शास्त्रज्ञ (Scientist) या पदासाठी भरती झाली, तर तुमचा प्रारंभिक पगार (Starting Salary) 75,000 ते 80,000 दरम्यान असेल. आता हा सांगितलेला पगार हा त्या पदासाठीचं मूळ वेतन (Basic Salary) आहे, म्हणजेच त्यात विविध प्रकारचे भत्ते (Allowances) जोडले तर हा पगार एक लाखांच्या जवळपास पोहोचेल.

हेही वाचा:

Aditya L1 Mission: आदित्य एल1 नं ISRO ला पाठवलाय सेल्फी; पृथ्वी अन् चंद्राचे फोटोही केलेत क्लिक

[ad_2]

Related posts