[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>सिक्कीममधील पुरामध्ये १४ जणांचा मृत्यू झाला आहे, तर २२ जवानांसह एकूण १०२ जण बेपत्ता आहेत. मंगळवारी सिक्कीममधील लोनाक तलावात ढगफुटी झाली, त्यामुळे तीस्ता नदीला पूर आला. पाण्याचा प्रवाह इतका भीषण होता की चुंगथान नावाचं धरण फुटलं. १०५ हेक्टर परिसरातील धरणक्षेत्रातील पाणी वाहून गेलं. यामुळे तीस्ता नदीची पातळी १५ ते २० फुटांनी वाढली, ज्यामध्ये अनेक नागरिक आणि वाहनं वाहून गेली. लष्कराच्या ४१ गाड्या चिखलाखील गाडल्या गेल्या. नागरी प्रशासन आणि लष्तराकडून युद्धपातळीवर शोधकार्य सुरू आहे. </p>
[ad_2]