[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
पुणे : पुण्यासह (Pune) राज्यातील आंबेडकरी जनतेने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची (babasaheb ambedkar) आगामी जयंती डीजे (DJ) आणि लेझर या गोष्टी टाळून करावी, असे आवाहन पुण्यातील कॅटालिस्ट फाउंडेशनने केले आहे. आपल्याशी संबंधित मंडळांमध्ये डीजे आणि लेझरचा वापर या वर्षीपासून बंद करण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला. पुणे शहरातील विविध मंडळे आणि विहारांना भेट देऊन त्यांनी जयंतीमध्ये डीजेचा वापर करू नये, असे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, असं वरिष्ठ पत्रकार आणि कॅटालिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील माने यांनी सांगितलं आहे.
आंबेडकरी जनतेचे अजूनही शिक्षण,नोकरी असे विविध प्रश्न सुटलेले नाहीत, अशा परिस्थितीत बाबासाहेबांच्या जयंती निमित्त लोकांना त्रास होईल असे वर्तन करण्यापेक्षा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. बाबासाहेब ज्ञानसूर्य होते त्यामुळे त्यांना विचारांनी मानवंदना देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी सामुदायिक प्रयत्न करण्याचा निर्णय घेण्यात आला. आपल्याशी संबंधित मंडळांमध्ये डीजे आणि लेझरचा वापर या वर्षीपासून बंद करावा, यासाठी पुणे शहरातील विविध मंडळे आणि विहारांना भेट देऊन त्यांचे मतपरिवर्तन करण्याचा निर्णय या निमित्ताने घेण्यात आला असल्याचं माने यांनी सांगितलं.
डीजे आणि लेझर मुळे होणारे तोटे तरुणांना समजावून सांगा…
ससून हॉस्पिटलच्या 100 मिटर परिसरात डीजेच्या ठेक्यावर तरुणाई नाचत असते हे दुर्दैवी आहे. तसेच लोहगाव विमानतळ परिसरात मिरवणुकीत वापरण्यात येणाऱ्या लेझर किरणांमुळे एखादा मोठा विमान अपघाताची शक्यता आहे. डीजेमुळे राज्यात 7 तर पुण्यात 2 जणांचे मृत्यू झाले आहेत. डीजे आणि लेझर मुळे होणारे तोटे तरुण मंडळांना समजावून सांगितले पाहिजे, असं ते म्हणाले.
गणपती विसर्जन मिरवणुकीत डीजेचा मोठा दणदणाट
यंदाच्या गणपती विसर्जन मिरवणुकीत डीजेचा मोठा दणदणाट बघायला मिळाला. त्यामुळे अनेकांना त्रास सहन करावा लागला. तर अनेकजणांना बहिरेपणा आल्याचं निदर्शनास आलं होतं. शिवाय शहरात आवाजाच्या पातळीने शंभरी गाठली होती. या आवाजामुळे इतर विकारांनादेखील आमंत्रण मिळतं. यंदाच्या गणपती विसर्जन मिरवणुकीतील दणदणाटावर टीका केली गेली. त्यानंतर आता येत्या काळात पुण्यात मोठ्या सणांच्या वेळी किंवा आंबेडकर जयंतीला असा दणदणाट होऊ नये, म्हणून पुढाकार घेण्यात आला आणि डीजे न वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. त्यामुळे पुण्यातील आंबेडकर जयंती यंदा शांततेत पार पडताना दिसते का?, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
इतर महत्वाची बातमी-
Pune Ganesh visarjan Noise Pollution : बापरे नुसत्याच कानठळ्या! मागील 20 वर्षात यंदा सर्वाधिक आवाजाची पातळी, कशी मोजली जाते आवाजाची पातळी?
[ad_2]