सर्वात मूर्ख व्यक्तीचा पुरस्कार मलाच मिळायला हवा, महिला असं का म्हणाली? पाहा Video

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Trending News: इंटरनेटवर कधी कधी विचित्र घटनांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधीकधी युजर्स अशा काही करामती करतात की त्यांवर कोणालाही विश्वास ठेवणे कठिण जाते. सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. कॅलिफॉर्नियातील जेनिफर एवरसोल हिने केलेली करामत पाहून युजर्सनी डोक्यावर हात मारुन घेतला आहे. तर, तिने केलेला प्रकार पाहून लोकांनी तिला सगळ्यात मूर्ख व्यक्ती हा पुरस्कार ही देऊ केला आहे. या घटनेनंतर तिने तिचा व्हिडीओ शूट करुन सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. 

काय घडलं नेमकं?

कॅलिफोर्निया येथे राहणाऱ्या जेनिफर एव्हरसोल हिने अजाणतेपणी तिच्या डोळ्यात आयड्रॉपच्या ऐवजी सुपरग्लू (गम) टाकले. त्यानंतर जे झाले ते पाहून नेटकरीही आश्चर्यचकित झाले आहेत. त्याचं झालं असं की, जेनिफरने आयड्रॉप आणि सुपरग्लू यांच्या बॉटल्स एकत्रच ठेवल्या होत्या आणि अजाणतेपणी तिने आयड्रॉपच्याऐवजी सुपरग्लूचा वापर केला. त्यानंतर काही वेळासाठी तिला दिसायचेच बंद झाले. 

जेनिफर एवरसोलने या घटनेचा व्हिडिओ केला आहे. त्यात तिने म्हटलं आहे की, मी सुपरग्लूच्या बाजूला आयड्रॉपची बॉटल ठेवली होती. तरीदेखील मी सुपरग्लूची बॉटल डोळ्यात टाकली. माझ्या या करामतीनंतर लोक मला सर्वात मूर्ख व्यक्तीचा पुरस्कार देण्याबाबत बोलत आहे,. त्याचबरोबर तेने हे देखील म्हटलं आहे की, मी डोळ्यात सुपरग्लू टाकल्यानंतर मी लगेचच डोळे बंद करण्याचा विचार केला. मात्र, डोळे बंद केल्यास काहीतरी विपरीत घडू शकते याची चाहूल लागली त्यामुळं मी डोळे बंदच केले नाही, असं तिने व्हिडिओत म्हटलं आहे. 

व्हिडिओवर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. युजर्सनी या घटनेवर आपलं मत मांडलं आहे. लोकांनी आयड्रॉप आणि सुपरग्लू एकमेकांजवळ ठेवल्याबद्दल विविध तर्क लढवले आहेत. एका युजर्सने म्हटलं आहे की, ड्रॉप एकमेकांजवळ का ठेवले होते, असा सवाल केला आहे. तर, अन्य एका युजर्सने म्हटलं आहे की मी माझ्या मनात फक्त कल्पना केली होती ती घटना प्रत्यक्षात घडली आहे.  

दरम्यान, या घडलेल्या प्रकारानंतर महिला नंतर एका नेत्ररोग विशेषज्ञांची भेट घेतली व त्यावर योग्य ते उपचार करुन घेतले. आता या महिलेचा डोळा ठिक होत आहे, असा खुलासा तिने केला आहे.

Related posts