Pune Crime News Pune Police Crime Branch Arrest Fake Ias Officer Fraud By Pretending To Be A Secretary In The Prime Ministers Office Pmo

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pune Crime news : पुण्यात सध्या तोतया (IAS) अधिकारी आणि पीए यांची संख्या वाढतच  (pune crime news) आहे. त्यांच्यावर कारवाई देखील केली जात आहे, अशीच एक कारवाई पुणे पोलिसांनी केली आहे. तोतया आय.ए.एस अधिकारी म्हणून वावरणाऱ्या एकाला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. डाॅ. विनय देव असे सांगून स्वत: आय. ए. एस. अधिकारी असून पंतप्रधान कार्यालय (Prime Minister office), दिल्ली येथे डेप्युटी सेक्रेटरी म्हणून नाेकरीस असल्याचे लाेकांना सांगून लाेकांमध्ये वावरत होता 

पुण्यातील एका कार्यक्रमात या तोतया अधिकाऱ्याचा पोलिसांनी छडा लावला. वासुदेव निवृत्ती तायडे असे हा व्यक्तीचे नाव असून तो तळेगाव दाभाडे येथील नागरिक आहे. पुण्यातील औंध भागात पुणे बाॅर्डर लेस वर्ल्ड फाऊन्डेशन या संस्थेच्या कार्यक्रमामधे जम्मु काश्मीर येथे मदतीसाठी पाठवण्याकरता ॲम्बुलन्स लोकार्पण साेहळा आयाेजित करण्यात आला हाेता. या कार्यक्रमाच्या वेळी वासुदेवने आपले नाव डाॅ. विनय देव असे सांगितले असून ते स्वत: आय. ए. एस. यापदावर असून सध्या त्यांची  सेक्राेटरी या पदावर पंतप्रधान कार्यालय, दिल्ली येथे असून ते गाेपनीय काम करत असतात असे सांगितले.  पोलिसांना या व्यक्तीचा संशय आला आणि त्याच्याकडे चौकशी केली असता हा सगळा प्रकार समोर आला. चतु:श्रृंगी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बॉर्डर लेस वर्ल्ड फाऊंडेशन या संस्थेचा औंध येथे 29 मे रोजी सकाळी कार्यक्रम होता. या कार्यक्रमामध्ये जम्मू काश्मीर येथे मदतीसाठी अ‍ॅम्बुलन्स पाठवण्याचा लोकार्पण सोहळा होता. या कार्यक्रमाला विरेन शहा, सुहास कदम, पी के गुप्त व इतर ट्रस्टी व सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये पाहुणे म्हणून आलेली एका व्यक्तीने आपले नव डॉ. विनय देव असे सांगितले. ते स्वत: आय ए एस या पदावर असून सध्या त्यांची सेक्रेटरी या पदावर पंतप्रधान कार्यालय, दिल्ली येथे आहे. ते गोपनीय काम करत असतात, असे सांगितले.

काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री कार्यालयाचा अधिकारी असल्याचं भासवून अनेकांना फोन करुन पैसे उकळल्याचा प्रकार समोर आला होता. नामवंत कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी कॉलेजमध्ये फोन करुन मुख्यमंत्री कार्यालयातून बोलतो आहे, असं सांगून प्रवेश मिळवून देत पालकांकडून पैसे उकळल्याचा प्रकार समोर आला होता.

[ad_2]

Related posts