Gold Rate Today On Dussehra Vijayadashami Know Details Jalgao Gold Rate Mumbai Pune Nashik Maharashtra 22 And 24 Carat Price Sone Dar

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Gold Silver Rate Today : राज्यासह देशभरात आज विजयादशमी दसऱ्याची (Vijaya Dashmi Dasara) धामधूम सुरु आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने खरेदीसाठी (Gold Rate Today) सराफा बाजारात रेलचेल आहे. दसऱ्यानिमित्त सराफा बाजारात उत्साह पाहायला मिळतोय. दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन्याचे (Gold rate on Dasara) भाव तुलनेनं कमी असल्याचं चित्र आहे. मुंबईत सोन्याचे दर प्रति तोळा 62 हजार 500 रुपयांवर (Mumbai Gold Rate) उघडला. काल मुंबईत सोन्याचा भाव प्रति तोळ्याला 62 हजार 400 होता. 

दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन्याचा दर

दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन्याचा दर प्रति तोळा 63 हजारांवर जाण्याचा अंदाज होता. मात्र तसं न होता, दर काहीसा स्थिर असल्याचं चित्र आहे. जळगाव सराफ बाजारात (Jalgaon Gold Rate) सोने दर 61 हजार 300 रुपयांवर आहे. जीएसटीसह एक तोळे सोन्याचा दर 63 हजार 139 रुपयांवर जातो.

गेल्या काही दिवसात सोन्याच्या दरात वाढ

इस्रायल आणि हमास युद्धाचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारावर होत असल्याने सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. दसऱ्याच्या सणामुळे सोन्याच्या मागणीत वाढ झाली आहे. त्याचा परिणाम म्हणनू सोन्याच्या दर वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. जळगाव सुवर्ण नगरीत गेल्या 48 तासात शुद्ध सोन्यात प्रति तोळा 1000 रुपयांची वाढ झाली आहे. तीन दिवसांपूर्वी 60000 रुपये असलेले सोने सोमवारी 61000 हजार रुपये दरावर पोहोचलं होतं. आज सोन्याचा दर 61 हजार 300 आहे. दसरा सण असल्याने जळगावसह संपूर्ण देशभरात अनेक ग्राहक सोने खरेदी करत असल्याने सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणत वाढ झाल्याचं दिसून येत आहे.

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोने खरेदीला पसंती

मुंबईत सोमवारी सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम सोने 62 हजार 400 रुपये होता. दसऱ्याला सोने 64 हजारांचा टप्पा पार करण्याचा अंदाज सराफा व्यापाऱ्यांनी वर्तवला होता. मागच्या वर्षी सोन्याचे भाव 63 हजारपर्यंत गेल्याचं पाहायला मिळालं होतं. दसरा, दिवाळी आणि लग्नाच्या सिझनला पुन्हा सुरुवात होणार असल्यानं सोन्याची चकाकी परतली आहे. दुसरीकडे, सोन्याच्या भाववाढीला जागतिक परिस्थिती देखील कारणीभूत आहे. मध्य पूर्वेतील भू-राजकीय परिस्थितीमुळे सोन्यात तेजी पाहायला मिळाली होती.

[ad_2]

Related posts