[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>श्रीकृष्ण जन्मभूमी वाद आणि आग्रा येथील शाही जामा मस्जिद वादाचे प्रकरण न्यायालयात असतानाच आता ताजमहालचा वाद समोर आलाय. श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती न्यासचे अध्यक्ष महेंद्र प्रताप सिंह यांनी ताजमहाल हे हिंदू मंदिर असल्याचा दावा केलाय. तसेच, श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती न्यास आता न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे. असंही महेंद्र प्रताप सिंह यांनी सांगितलंय. श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती न्यासने याआधी मथुरेमध्ये श्रीकृष्ण जन्मभूमी वाद आणि आग्रा येथील शाही जामा मस्जिद वादावरूनही न्यायालयात धाव घेतली आहे. </p>
[ad_2]