( प्रगत भारत । pragatbharat.com)
What Is Gotra: हिंदू धर्मात गोत्राला विशेष महत्त्व आहे. धार्मिक विधीपासून ते लग्न जमवतानादेखील ज्योतिषांकडून तुमच्या गोत्राबाबत माहिती घेतली जाते. हिंदू धर्मात गोत्र नसल्यास लग्ना पार पडत नाहीत. जर मुलगा आणि मुलगी यांचं एकच गोत्र एकच असेल तर त्यांचा विवाह होऊ शकत नाही. म्हणूनच वर-वधुंच्या पत्रिका जमवताना आधी गोत्र पाहतात. हिंदू धर्मात लग्न जमवण्यासाठी गोत्राला विशेष महत्त्व का आहे, याचे कारण जाणून घेऊया…
गोत्र कोणती आहेत?
ज्योतिषानुसार, सप्तर्षीच्या नावानुसार गोत्र आहेत. सप्तर्षी गौतम, कश्यप, वशिष्ठ, भारद्वाज, अत्रि, अंगिरस, मृगु, अशा सात ऋषीच्या नावावरुन वैदिक काळापासून गोत्र प्रचलित आहेत. एकाच घराण्यात वा रक्ताच्या नात्यात होणारा विवाह थांबवण्यासाठी गोत्र स्थापित करण्यात आले आहेत, अशी एक मान्यता आहे. त्याचबरोबर सगोत्र असलेले तरुण-तरुणांना विवाह निषिद्ध आहे, असाही नियम त्यासोबत प्रचलित करण्यात आला.
गोत्राचा अर्थ काय?
मुलगा आणि मुलीचं एकच गोत्र असल्यास त्याचा अर्थ आपल्या पुर्वजांचे घराणे एकच आहे. त्यामुळं एकाच गोत्रातील तरुण-तरुणींमध्ये भाऊ- बहिणींचे नाते आहे, असं मानले जाते. असंही म्हटलं जातं की, एकाच गोत्रात विवाह झाला तर त्या दांपत्यापासून जन्माला येणारे संतान हे व्यंग असणारे असते. काही जाणकारांच्या मते, सात पिढ्यांनतर गोत्र बदलते. म्हणजेच सात पिढ्यांमध्ये एकच गोत्र असेल तर आठव्या पिढीत त्याच गोत्रातील व्यक्तीशी विवाह करण्याचा विचार केला जाऊ शकतो. यावर अनेकांचे एकमत नाही.
तीन गोत्र सोडून विवाह
बहुतेक हिंदू धर्मात पाच किंवा तीन गोत्र सोडून विवाह केला जातो. तीन गोत्रांपैकी पहिले गोत्र हे तुमच्या वडिलांचे गोत्र, दुसरे आईचे गोत्र ( आईच्या कुटुंबातील सदस्यांचे गोत्र) आणि तिसरे गोत्र हे तुमच्या आजीचे गोत्र आहे (आजीच्या कुटुंबातील सदस्यांचे गोत्र) ज्योतिषास्त्रानुसार, हे तीन गोत्र सोडून लग्न करतात.
कश्यप गोत्र
आजच्या समाजात सर्वांनाच आपले गोत्र साधारणपणे माहिती असते. पण असंही होऊ शकतं की, एखाद्याला आपले गोत्र माहिती नसते. अशावेळी त्याने आपले गोत्र कश्यप मानावे. असं सांगण्यामागे एक कारण आहे जे शक्यतो योग्य मानलं जातं. असं म्हणतात की, कश्यप ऋषींनी अनेक विवाह केले होते ज्यामुळे त्यांना अनेक मुले झाली आणि ही मुले कोठे ना कोठे कश्यप गोत्राशीच जोडली गेली होती.
वैज्ञानिक महत्त्व
एकाच गोत्रात विवाह करु नये याला काही जाणकार शास्त्रीय आधार असल्याचेही सांगतात. एकाच कुळातील किंवा रक्ताच्या नात्यात विवाह केल्यास पुढे जन्माला येणाऱ्या मुलात शारिरीक किंवा मानसिक व्यंग असू शकते, असं काही जण सांगतात. त्या कुळातील दोष, रोग हे पुढच्या पिढिकडे येतात. त्यालाच अनुवांशिक आजार असंही म्हणतात. म्हणून हे टाळण्यासाठी तीन गोत्र सोडून विवाह करतात. वेगवेगळ्या गोत्रात विवाह केल्याने मुलांमधील दोष व रोग नष्ट करण्याची क्षमता वाढते व मुलं निरोगी जन्माला येतात, असं काही जाणकार सांगतात.