Retail Inflation Data Business News India Retail Inflation Surges In November Challenge For Government 

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Retail Inflation Data : महागाईनं (inflation) सर्वसामान्यांना आणखी एक झटका दिला आहे. सरकारने नोव्हेंबर महिन्याची किरकोळ चलनवाढीची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार भारताचा किरकोळ महागाई दर  नोव्हेंबरमध्ये वार्षिक आधारावर 5.5 टक्क्यांनी वाढला आहे, तर ऑक्टोबरमध्ये हा महागाई दर 4.87 टक्क्यांवर होता. वित्त मंत्रालयाने नोव्हेंबर महिन्यातील किरकोळ आणि खाद्यपदार्थांच्या महागाईची आकडेवारी शेअर केली आहे. त्यानुसार ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये महागाई वाढली आहे.

दुसरीकडं खाद्यपदार्थांच्या किंमतीत वाढ झाल्यामुळं नोव्हेंबर महिन्यात अन्नधान्य महागाई 8.7 टक्के झाली आहे, तर ऑक्टोबरमध्ये ती 6.6 टक्के होती. रॉयटर्सच्या सर्वेक्षण अहवालात अन्नाच्या किंमतीतील अस्थिरतेमुळं, किरकोळ चलनवाढ अनुक्रमिक आधारावर 80 अंकांपेक्षा जास्त 5.7 टक्क्यांनी वाढेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. 

आरबीआयने हे लक्ष्य ठेवले होते

गेल्या आठवड्यात डिसेंबरच्या धोरण बैठकीत आरबीआयने चलनवाढीचे लक्ष्य 5.4 टक्क्यांवर कायम ठेवले होते. ऑगस्टच्या धोरणात, RBI MPC ने आर्थिक वर्ष 2024 साठी महागाई 5.1 टक्क्यांवरून 5.4 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. RBI चे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी किरकोळ महागाई किंवा CPI डेटा तिसऱ्या तिमाहीत 5.6 टक्के आणि चौथ्या तिमाहीत 5.2 टक्के असा अंदाज व्यक्त केला होता.

आरबीआयचे गव्हर्नर यांनी चिंता व्यक्त केली होती

भारतीय रिझर्व्ह बँकेने आर्थिक वर्ष 2025 च्या पहिल्या तिमाहीत CPI महागाई दर 5.2 टक्के, दुसर्‍या तिमाहीत 4 टक्के आणि तिसर्‍या तिमाहीत 4.7 टक्के असा वर्तवला आहे. गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले होते की, सेंट्रल बँकेने ऑक्टोबर 2023 मध्ये चलनवाढीचा दर 5 टक्क्यांच्या खाली आणण्यासाठी लक्षणीय वाढ नोंदवली आहे. मात्र, 4 टक्के सीपीआयचे उद्दिष्ट अद्याप साध्य झालेले नाही. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी याबाबत चिंता व्यक्त केली होती.

महागाई नियंत्रणात आणण्याचे सरकारसमोर आव्हान 

किरकोळ महागाई वाढल्याने सर्वसामान्यांना मोठा धक्का बसला आहे. अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी 11 डिसेंबरला संसदेत सांगितले होते की किरकोळ महागाई दर स्थिर आहे. परंतु काल म्हणजेच 12 डिसेंबर रोजी जाहीर झालेल्या आकडेवारीने लोकांना आश्चर्यचकित केले आहे. ही महागाई कमी करणे सरकारपुढे आव्हान असेल.

महत्त्वाच्या बातम्या:

Congress Hallabol Morcha : महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेस आक्रमक; सोमवारी नागपूर विधानभवनावर ‘हल्लाबोल’ मोर्चा

[ad_2]

Related posts