Mokshada Ekadashi 2023: वर्षातील शेवटची एकादशी कधी? घरी आणा ‘या’ 4 वस्तू, नांदेल सुख-समृद्धी

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Mokshada Ekadashi 2023 : हिंदू धर्मात एकादशी तिथीला अतिशय महत्त्व आहे. वर्षातील प्रत्येक महिन्यात 2 एकादशी येतात. याचा वर्षाला 24 एकादशी असतात. यंदा अधिकमास आल्यामुळे 2 एकादशी जास्तीच्या आल्या होत्या. त्यामुळे 2023 मध्ये एकूण 26 एकादशी आल्या होत्या. या वर्षातील शेवटची एकादशी ही मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षाला आहे. या तिथाला मोक्षदा एकादशी म्हणून ओळखली जाते. शुक्रवार 22 डिसेंबरला मोक्षदा स्मार्त एकादशी आहे तर शनिवार 23 डिसेंबरला भागवत एकादशी असणार आहे. एकादशीचं व्रत हे भगवान विष्णूला समर्पित करण्यात आले आहे. या दिवशी मोक्ष प्राप्ती आणि पितरांचा मोक्षासाठी पूजा केली जाते. (When is the last Ekadashi of the year Bring home these 4 things happiness prosperity Mokshada Ekadashi 2023)

मोक्षदा एकादशीला ‘या’ वस्तू घरी आणा

ज्योतिषशास्त्रानुसार मोक्षदा एकादशीच्या दिवशी काही उपाय केल्यास अनेक समस्यांपासून तुम्हाला मुक्तता मिळते. शिवाय या दिवशी तुम्ही घरात काही वस्तू खरेदी केल्यास घरात सुख समृद्धी सदैव नांदते. 

माशाची मूर्ती

हिंदू धर्मात भगवान विष्णूच्या 10 अवतारांपैकी मत्स्य हा पहिला अवतार मानला जातो. त्यामुळे मोक्षदा एकादशीच्या दिवशी माशाची चांदीची मूर्ती घरी आणून घराच्या उत्तर दिशेला स्थापित केल्यास घरातील वास्तूदोष नाहीसे होतात असं म्हणतात. 

पांढरा हत्ती

मान्यतेनुसार मोक्षदा एकादशीच्या दिवशी घरी पांढऱ्या हत्तीची मूर्ती घरी आणल्याने वास्तुदोष दूर होण्यास मदत मिळते. पांढरा हत्ती भगवान विष्णूंला प्रिय आहे, अशी मान्यता आहे. 

तुळशी

धार्मिक मान्यतेनुसार एकादशीला तुळशी मातेची पूजा करणं शुभ मानली जाते. या पूजेने भगवान विष्णू प्रसन्न होतात. तुळशीला माता लक्ष्मीचं रूप मानलं गेलं आहे. मोक्षदा एकादशीच्या दिवशी तुळशीचे रोप घरी आणावं. यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या घरावर कायम राहतो. 

कामधेनु गाय

पौराणिक कथेनुसार, प्राचीन काळी समुद्रमंथनादरम्यान क्षीर सागरातून कामधेनू गाय प्रकट झाली होती, असं म्हणतात. हिंदू धर्मात कामधेनू गायीला विशेष महत्त्व असून घरात सुख-समृद्धी हवी असेल तर मोक्षदा एकादशीच्या दिवशी घरी कामधेनू गाईची मूर्ती स्थापित करून तिची पूजा करणं शुभ मानलं जातं.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

 

Related posts