Coronavirus New Cases Covid 19 JN.1 New Cases 197 Cases Of Sub-variant JN.1 Detected In India Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Corona JN.1 Variant Update : नव्या वर्षात कोरोनाने (Coronavirus) डोकेदुखी वाढवली आहे. कोविड-19 (Covid New Cases) चा संसर्ग सातत्याने वाढत आहे. कोरोनाच्या नव्या JN.1 व्हेरियंटचा (Omicron Sub-Variant JN.1) वाढता धोका पाहायला मिळत आहे. नवीन वर्षात भारतातील (Coronavirus Update in India) कोविड-19 च्या सक्रिय रुग्णांची संख्या 4394 वर पोहोचली आहे. कर्नाटक कोरोना विषाणूची परिस्थिती चिंताजनक आहे आणि कर्नाटकात गेल्या 24 तासात 296 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांच्या पॉझिटिव्हीटी दरामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. थर्टी फर्स्ट आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने गर्दीच्या ठिकाणी जाण्यामुळे संसर्ग वाढला आहे.

एका दिवसात 636 नवे कोरोनाबाधित

गेल्या 24 तासांत देशभरात 636 जणांना कोरोना संसर्ग झाला आहे. कर्नाटकात 24 तासांत कोरोनाचे 296 नवे रुग्ण आढळलेले आहेत. याशिवाय महाराष्ट्रातही नवा व्हेरियंट हात-पाय पसरताना दिसत आहे. महाराष्ट्रात कोरोना पॉझिटिव्ह दर 2 च्या वर पोहोचला आहे. एकीकडे थंडीला सुरुवात झाल्याने हवामानात मोठा बदल जाणवत आहे, त्यातच नव्या JN.1 कोरोना व्हेरियंटचा धोका, यामुळे रुग्णांमध्ये वाढ होत आहे. देशात कोविड-19 चा सब-व्हेरियंट  JN.1 च्या सक्रिय रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे.

JN.1 सब-व्हेरियंटच्या 197 रुग्णांची नोंद

ताज्या आकडेवारीनुसार, देशात कोरोनाच्या JN.1 सब-व्हेरियंटच्या एकूण 197 रुग्णांची नोंद झाली आहे. भारतीय SARS-CoV-2 Genomics Consortium (INSACOG) च्या म्हणजे जीनोम सीक्वेन्सिंगच्या माहितीनुसार, ओडिसामध्येही नव्या JN.1 सब-व्हेरियंटचे रुग्ण आढळले आहेत. सध्या देशातील दहा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी JN.1 सब-व्हेरियंट पसरला आहे. यामध्ये केरळमध्ये 83, गोव्यात 51 आणि गुजरातमध्ये 34 रुग्ण हे सर्वाधिक संसर्ग असलेले तीन राज्य आहेत. याशिवाय या राज्यांमध्ये कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा, ओडिशा आणि दिल्ली या राज्यांचाही समावेश आहे.

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

[ad_2]

Related posts