Reserve Bank of India asked the National Payments Corporation of India to examine a request from Paytm to become a third party application provider

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Reserve Bank of India on Paytm : भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला (National Payments Corporation of India) पेटीएम (Paytm) औपचारिकपणे वन 97 कम्युनिकेशन्स (One 97 Communications) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, थर्ड पार्टी ॲप्लिकेशन प्रदाता (TPAP) बनण्यासाठी केलेल्या विनंतीचे परीक्षण करण्यास सांगितले आहे. पेटीएमची विनंती मान्य झाल्यास Paytm ला देशातील युनिफाइड पेमेंट इंटरफेसद्वारे पेमेंट प्रक्रिया सुरू ठेवण्यास मार्ग मोकळा होईल. 

31 जानेवारी रोजी आरबीआयने पेटीएम पेमेंट्स बँकेला 15 मार्चपर्यंत आपला व्यवसाय बंद करण्यास सांगितले होते. यानंतर पेटीएमला जबर हादरा बसला आहे. “सध्याचे युझर्स नवीन हँडलवर समाधानकारकपणे स्थलांतरित होईपर्यंत या TPAP द्वारे कोणतेही नवीन वापरकर्ते जोडले जाणार नाहीत,” असेही आरबीआयने म्हटले आहे.

मुदत 15 मार्चपर्यंत मुदत वाढवली

दरम्यान, 31 जानेवारी रोजी रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट्स बँकेवर केलेल्या कारवाईची माहिती दिली. रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट्स बँकेला नवीन ग्राहक जोडण्यास आणि कर्ज देण्यावर तात्काळ बंदी घातली. त्याचवेळी 29 फेब्रुवारीनंतर पेटीएम पेमेंट्स बँक खाते, वॉलेट इत्यादींमध्ये पैसे जमा करण्यावर बंदी असेल असे सांगण्यात आले. आता या प्रकरणी आरबीआयने थोडा दिलासा दिला असून 29 फेब्रुवारीची मुदत 15 मार्चपर्यंत ढकलली आहे.

उर्वरित शिल्लक रकमेवर कोणतेही बंधन राहणार नाही

RBI FAQ नुसार, पेटीएम पेमेंट्स बँकेत उघडलेली बँक खाती 15 मार्चनंतरही बंद होणार नाहीत. जर तुमचे पेटीएम पेमेंट्स बँकेत बचत किंवा चालू खाते उघडले असेल आणि त्यात पैसे असतील, तर तुम्ही 15 मार्चनंतरही काढू शकता जसे तुम्ही आतापर्यंत करत आहात. जोपर्यंत तुमच्या खात्यात शिल्लक आहे तोपर्यंत त्याच्या वापरावर कोणतेही बंधन नाही.

15 मार्चनंतर पगार मिळणार नाही

रिझर्व्ह बँकेने मुदत वाढवून दिलेल्या सवलतीनुसार, 15 मार्चनंतर पेटीएम पेमेंट्स बँकेच्या वॉलेटमध्ये, बचत किंवा चालू खात्यात पैसे जमा होणार नाहीत. याचा अर्थ असा की जर तुमचा पगार पेटीएम पेमेंट्स बँकेच्या खात्यात आला, तर तुम्हाला 15 मार्चनंतर अडचणी येऊ शकतात. कारण तुमचा पगार पेटीएम पेमेंट्स बँकेच्या खात्यात जमा होणार नाही. ही समस्या टाळण्यासाठी तुम्ही आगाऊ दुसऱ्या बँकेत नवीन खाते उघडावे आणि तुमच्या बँकेकडे त्याची माहिती अपडेट करावी.

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts