Antarwali Sarathi Maratha Reservation Protest Yva Shivsena Aditya Thackeray statement on Manoj jarange maratha reservation

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे. जेव्हा लाठीचार्ज झाला होता, जेव्हा पहिल्यांदा लाठीचार्ज झाला, डोकी फुटली होती, गोळीबारही झाला होता. मूळ गोष्ट हीच आहे की, अशी आंदोलनं उठवायची असतील, तर पोलीस कुठल्याही आदेशाशिवाय करत नाहीत. तेव्हा पण मी प्रश्न विचारला होता की, हा आदेश देणारे जनरल डायर कोण आहेत. एक मुख्यमंत्री आणि दोन मुख्यमंत्री यामधील जनरल डायर कोण आहे, याचं उत्तर मिळायला हवं, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले?

आदित्य ठाकरे म्हणाले की, मनोज जरांगे यांनी केलेल्या आरोपांची चौकशी होईलच. मात्र ज्यावेळी याची सुरुवात झाली त्यावर आपण बोलायला हवं, ज्यावेळी आंतरवाली सराटीत लाठीचार्ज झाला होता. अनेकांना  जखमा झाल्या. उपोषणाला बसलेल्या पहिल्या दिवसापासून सगळा प्रकार सुरु आहे. ज्यावेळी लाठीचार्ज झाला त्यावेळी इंडिया आघाडीची बैठक सुरु होती. एखाद्या ठिकाणी लाठीचार्ज झाला तर त्या परिसरातील पोलीस प्रशासनाची बदली केली जाते. तसं एसपींची बदली केली. मात्र एवढी मोठी आंदोलनं करण्यासाठी पोलिसांनाो आदेशाची गरज असते.  त्यांना आदेश देणारे जनरल डायर कोण आहेत? हे आपल्याला समजायला हवं. या घटनाबाह्य सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आहेत. कधीही आदेशाशिवाय आंदोलन उठवत नाही. त्यामुळे या संदर्भातील जनरल डायर नेमके मुख्यमंत्री आहेत की उपमुख्यमंत्री आहे, याचा शोध घेतला पाहिजे. 

मनोज जरांगे पाटीलआक्रमक झाले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टोकाची गंभीर टीका केल्यानंतर मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. मराठा कार्यकर्ते जरांगे पाटलांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, फडणवीसांच्या मुंबईतील सागर बंगल्यावर आंदोलन करण्याची जरांगेंची भूमिका असून ते उपोषण स्थळ सोडून मुंबईच्या दिशेने निघाले आहेत.  मी तुझ्या सागर बंगल्यावर येतो, निघालो मी असं म्हणत जरांगेंनी मुंबईची वाट धरली आहे. उपोषणामुळे जरांगेची प्रकृती खालावली आहे. अशक्तपणामुळे त्यांना नीट चालताही येत नाही. पण, तरीही जरांगे मुंबईला सागर बंगल्यावर जाण्यावर ठाम आहेत. गावकरी आणि मराठा कार्यकर्ते त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहे

 

इतर महत्वाची बातमी-

Maratha Reservation : सलाईनमधून विष देण्याचा, माझं एन्काऊंटर करण्याचा फडणवीसांचा डाव; मनोज जरांगे पाटलांचे गंभीर आरोप

 

 

 

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts