Passenger train ticket fares decreased central government decision before Lok Sabha election marathi news  

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : पॅसेंजर ट्रेनमधून (Passenger Trains) दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी आहे. भारतीय रेल्वेने प्रवासी गाड्यांच्या तिकीट दरात मोठी कपात करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे तिकीट दर कोरोना महामारीपूर्वीच्या पातळीवर आले आहेत. दैनंदिन प्रवाशांवरील आर्थिक भार कमी करणे हा या निर्णयामागचा उद्देश आहे. या अंतर्गत रेल्वेच्या तिकीट दरात सुमारे 40 ते 50 टक्क्यांनी घट झाली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या तिकिटामध्ये 10 ते 30 रुपयांची घट झाली आहे. यापूर्वी प्रवाशांना पॅसेंजर गाड्यांमध्ये प्रवास करण्यासाठी एक्स्प्रेस ट्रेनचे भाडे द्यावे लागत होते. 

भारतीय रेल्वेने 27 फेब्रुवारीपासून ‘पॅसेंजर ट्रेन्स’चे सामान्य द्वितीय श्रेणीचे भाडे पूर्ववत केले आहे. त्यांना आता ‘एक्स्प्रेस स्पेशल’ किंवा ‘डेमू एक्सप्रेस’ गाड्या म्हणतात. कोविड-19 महामारीच्या काळात प्रवासी गाड्या तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या होत्या. त्या पुन्हा सुरू झाल्यावर किमान तिकिटाची किंमत 10 रुपयांवरून 30 रुपये करण्यात आली. हे एक्स्प्रेस गाड्यांच्या भाड्यानुसार होते. मात्र नुकत्याच झालेल्या घोषणेनंतर ही किंमत अर्ध्यावर आली असून त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

मेमू ट्रेनच्या भाड्यात कपात

रेल्वे अधिकाऱ्यांनी सर्व मेनलाइन इलेक्ट्रिक मल्टीपल युनिट (MEMU) ट्रेन आणि ‘झिरो’ पासून सुरू होणाऱ्या ट्रेन्ससाठी साधारण वर्गाच्या भाड्यात सुमारे 50 टक्क्यांनी कपात केली आहे. अनारक्षित तिकीट प्रणाली (UTS) ॲपमधील भाडे रचना देखील त्यानुसार बदलण्यात आली आहे. ज्यांचे आधी पॅसेंजर ट्रेन म्हणून वर्गीकरण करण्यात आले होते आणि आता त्या देशभरात ‘एक्स्प्रेस स्पेशल’ किंवा मेमू ट्रेन म्हणून धावत आहेत अशा गाड्यांसाठी ही भाडे कपात लागू आहे 

तिकीट दर कमी करण्याची मागणी होती

अनेक गंतव्यस्थानांच्या तिकिटांचे दर आधीच्या निम्म्या दराने कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांना आवश्यक तो दिलासा मिळाला आहे. बदललेले भाडे गुरुवारपासून लागू झाले आहे. हे भाडे कमी करण्यात यावे अशी मागणी सातत्याने होत होती. 

कोरोना साथीच्या रोगाच्या काळात गर्दी वाढू नये म्हणून अनेक पॅसेंजर गाड्या चार वर्षांपूर्वी तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या होत्या. त्या पुन्हा सुरू झाल्यावर प्रवाशांना प्रवाशासाठी एक्स्प्रेसचे भाडे द्यावे लागले. तिकीट दर कमी करण्याची मागणी लोकप्रतिनिधी आणि प्रवासी संघटनांकडून सातत्याने होत आहे. नुकत्याच झालेल्या भाडे कपातीचे प्रवाशांकडून चांगलेच कौतुक होत आहे. नवीन दरांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts