Weather Update Today IMD Rain Prediction for next 48 hours in maharashtra himachal snowfall in uttrakhand marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

IMD Weather Update Today : पुढील 48 तास राज्यासह देशात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून महाराष्ट्रासह देशात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपलं आहे, तर अनेक ठिकाणी गारपीटही पाहायला मिळत आहे. नव्याने सक्रिय झालेल्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे राज्यासह देशाच्या हवामानावर परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे. आज आणि उद्या अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

1 मार्चपर्यंत विविध ठिकाणी पावसाची शक्यता

भारतील हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, आजपासून 1 मार्चपर्यंत अनेक भागात पावसाची रिमझिम दिसणार आहे. राज्यात मराठवाडा, विदर्भात विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता असून काही ठिकाणी गारपीट होण्याचाही अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.

वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम, पावसाचा अंदाज

भारतीय हवामान विभागाने (IMD) जारी केलेल्या हवामान बुलेटिननुसार, 29 फेब्रुवारीपासून पश्चिम हिमालयीन प्रदेश आणि 1 मार्च ते 3 मार्च दरम्यान लगतच्या मैदानी भागावर सक्रिय वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम होण्याची शक्यता आहे. सक्रिय  वेस्टर्न डिस्टर्बन्स 1 आणि 2 मार्च रोजी तीव्रतेच्या शिखरावर पोहोचण्याची शक्यता आहे. या काळात अरबी समुद्रापासून वायव्य भारतापर्यंत उच्च आर्द्रता वाढण्याची शक्यता आहे. परिणामी, 1 मार्चला उत्तराखंडमध्ये गारपिटीसह डोंगराळ प्रदेशात मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टीचा अंदाज आहे.

अवकाळी पावसामुळे शेतीचं नुकसान

गेल्या दोन दिवसांत राज्यात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. विशेषतः कापणीसाठी तयार झालेल्या उभ्या पिकांची नासाडी झाली आहे. हवामान विभागाने (IMD) पावसाचा इशारा दिला होता, मात्र नुकसान टाळता आलेलं नाही. पुढील दोन दिवस विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे.

महाराष्ट्रासह ‘या’ भागात पावसाची शक्यता

पुढील दोन ते तीन दिवसांत मध्य प्रदेश, उत्तर छत्तीसगड, झारखंड, बिहार, उत्तराखंड आणि उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह  गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशातील अनेक जिल्ह्यात गारपिटीसह जोरदार वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पावसासह हिमवृष्टीचीही दाट शक्यता

1 मार्चला जम्मू-काश्मीर-लडाखमध्ये मुसळधार पाऊस आणि हिमवृष्टी होण्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. हिमाचल प्रदेशात 1 मार्च आणि 2 मार्चला अनेक ठिकाणी मुसळधार पाऊसासह हिमवृष्टी होण्याची दाट शक्यता आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Rain : निसर्ग कोपला, हातातोंडाशी आलेलं घास निसटला, राज्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ, बळीराजा चिंतेत

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts